सहकार भारतीतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Womens Day सहकार भारती नागपूर महानगर, नागपूर जिल्हा तसेच कल्पतरू महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम सिटी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, किडा चौक, चंदननगर येथे पार पडला.
 
Womens Day
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्पतरू महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा निलिमा बावणे या होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोटिवेशनल स्पीकर डॉ. मीनल दवंडे तसेच सायकोलॉजिस्ट व सोशल मीडिया इन्फ्लुएंसर डॉ. कनक गिल्लूरकर शर्मा यांनी उपस्थित राहून महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. Womens Day  कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून आमदार सविता मते यांची उपस्थिती लाभली. यावेळी नेहा वासनिक यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
 
मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, स्वावलंबन, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला विविध महिला पदाधिकारी, कर्मचारी तसेच बचत गटातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची प्रस्तावना अंजली मुळे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता खापरे यांनी केले, तर अनघा धारकर यांनी आभार प्रदर्शन केले. Womens Day  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता ठाकरे (महानगर महिला प्रमुख), सोनाली महेर (ग्रामीण महिला प्रमुख), अनिता झाडे (ग्रामीण महिला सहप्रमुख), संध्या कोठेकर, नेहा लगाटे व सराफ यांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य: अंजली मुळे, संपर्क मित्र