मुंबई BMC समिती निवडणूकीत महिला बालकल्याण व कायदा समित्यांवर शिवसेना-भाजपचे वर्चस्व

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
मुंबई,
bmc committee elections मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) महिला व बालकल्याण समिती आणि कायदा समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी झालेल्या निवडणुका सोमवारी बिनविरोध पार पडल्या. प्रत्येक पदासाठी केवळ एकच उमेदवारी आल्यामुळे कोणतीही चुरस न होता सर्व उमेदवार निवडून आले.
 
 
bmc committee elections
 
 
महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या नगरसेविका मीनल संजय तुर्डे यांची बिनविरोध निवड झाली, तर भाजपच्या रीटा भरत मकवाना यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्याचप्रमाणे, कायदा समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या दीक्षा हर्षद करकर यांची बिनविरोध निवड झाली असून भाजपचे अनिश नवल मकवानी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
 
 
 
या निवडणुकीत महापौर रितू तावडे यांनी महिला व बालकल्याण समितीच्या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले, तर उपमहापौर संजय घाडी यांनी कायदा समितीच्या निवडणूक प्रक्रियेवर देखरेख केली. यावेळी महानगरपालिकेचे विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. बीएमसीमधील या दोन्ही समित्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.bmc committee elections महिला व बालकल्याण समिती शहरातील महिला व मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांवर लक्ष ठेवते, तर कायदा समिती महानगरपालिकेच्या कायदेशीर बाबींशी संबंधित निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते.