वक्तृत्व स्पर्धेत सौमित्र बोरीकर प्रथम

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
नागपूर,
oratory competition स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती, नागपूर तर्फे स्वर्गीय जगन्नाथराव नाईकवाडे स्मृतीप्रित्यर्थ सावरकर आत्मर्पण दिनानिमित्त सी. पी. अँड बेरार कॉलेज येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 
nagpur
 
या स्पर्धेत द्वितीय गट (इयत्ता ८ वी व ९ वी) मध्ये श्री गजानन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ९ वीचा विद्यार्थी सौमित्र श्रीरंग बोरीकर याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याचा सत्कार शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय तंबाखे , उपमुख्याध्यापक अग्रवाल तसेच पर्यवेक्षक कावटे यांनी त्याचे अभिनंदन करून कौतुक केले. oratory competition या यशासाठी त्याला शाळेतील शिक्षिका मीना बावणे व वैशाली डाखोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
सौजन्य: विजय बोरीकर, संपर्क मित्र