एसटीत मेगाभरती! 17 हजारांहून अधिक जागा, प्रवाशांसाठी उत्तम सेवा

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
मुंबई,
st-corporation-recruitment : राज्यातील एसटी महामंडळात 17,742 ड्रायव्हर, कंडक्टर आणि कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती होणार आहे. ही भरती नवीन 8,300 बसेससाठी केली जाणार असून महामंडळाच्या ताफ्यात लवकरच या बसेसचा समावेश होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली.
 
 
st
 
 
 
सरनाईक यांनी सांगितले की, कंत्राटी भरती ही तात्पुरती असून नियमित कर्मचाऱ्यांसाठी अर्ज अर्थ खात्याकडे पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, प्रवाशांना उत्तम सेवा देणे हा सर्वांचा प्रमुख उद्दिष्ट असल्यामुळे चालक-वाहकांना न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
 
मुंबईसाठी 30 स्लिपींग कोच बसेस आणि 170 बैठकींच्या वोल्वो बसेस देखील लवकरच उपलब्ध होतील. यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत.
 
सरकारच्या मागील निर्णयांनुसार, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची मुभा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभर पत्नीसह मोफत प्रवासाची सुविधा दिली जात आहे.
 
यासोबतच, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अनुदानित महाविद्यालयांमध्ये 5,012 सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले. हा निर्णय एसटीच्या सेवा सुधारणा आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील रिक्त पदे भरती या दोन्हीसाठी मोठा टप्पा ठरणार आहे.