संचमान्यता अद्ययावत नाही; तरी शिक्षकांचे समायोजन!

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
वर्धा,
Staffing Approval Not Updated शाळांची संचमान्यता पूर्ण झाल्यावर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या समायोजनाची कार्यवाही अपेक्षीत आहे. संचमान्यता अद्यावत झाली नसताना मंगळवार १७ रोजी शिक्षणाधिकारी (माध्य.) जयश्री राऊत यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी नोंदविलेल्या आक्षेपांवर सुनावणी घेतल्याने ही प्रक्रिया आता संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेवर प्रहार शिक्षक संघटनेने आक्षेपही नोंदविला आहे.
 
 
wardha
 
जिल्ह्यातील २१३ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे समायोजन करण्याचे शिक्षण विभागाने निश्चित केले. पण, या प्रक्रियेवर ४८ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी आक्षेप नोंदविले आहे. याच ४८ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या आक्षेपांच्या अनुषंगाने मंगळवारी शिक्षणाधिकारी जयश्री राऊत यांनी त्यांच्या दालनात शिक्षण संस्थांचे अध्यक्ष, संबंधित शाळांतील मुख्याध्यापक, आक्षेपकर्ता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना बोलवत सुनावणी घेतली. Staffing Approval Not Updated पण, सुनावणी बाबात इत्यंभूत माहिती माध्यम प्रतिनिधींना मिळणार नाही याबाबत गुप्तता बाळगण्याच्या मौखिक सूचना शिक्षणाधिकारी जयश्री राऊत यांनी आपल्या सहकार्‍यांना दिल्या असल्याचेही आता पुढे आले आहे. त्यामुळे समायोजन प्रक्रियेवर आक्षेप नोंदविणारे कुठल्या तालुयातील किती शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी याची माहिती मिळू शकली नाही.
 
 
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजन प्रक्रिया कधी राबवावी याबाबत शासन स्तरावरुन कोणतेही लेखी आदेश नाही. मात्र, वर्धा जिल्ह्यात समायोजन प्रक्रियेची कार्यवाही सुरू केली आहे. विशेष म्हणजे १०० टक्के शाळांना संच मान्यता प्राप्त न होता समायोजन प्रक्रिया राबविणे बेकायदेशिर आहे. Staffing Approval Not Updated तसेच शून्य शिक्षकी शाळांबाबत शासन स्तरावर कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नसल्याने त्या शाळा बंद करुन तेथील कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे समायोजन करणे म्हणजे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा भंग आहे. हे प्रहार शिक्षक संघटना खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रहार शिक्षक संघटनेचे नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर यांनी दिली.
 
 
प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना आहेत : शिक्षण उपसंचालक
राज्यात ९० टक्के संचमान्यतेचे काम झाले आहे. ३१ मार्चपर्यंत समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना वरिष्ठांच्या आहेत. आक्षेपाच्या अनुषंगाने संचमान्यतेबाबत दुरुस्ती किंवा इतर प्रस्ताव Staffing Approval Not Updated असल्यास ते शिक्षणाधिकार्‍यांनी ते उपसंचालकांना एकत्रित करून पाठविण्याच्याही सूचना आहेत, अशी प्रतिक्रिया शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी दिली.