गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सेलूत राज्यस्तरीय शंकरपट-कृषी महोत्सव

१२.५० लाखांचे बक्षीसं

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
सेलू,
Gudi Padwa स्व. नरहरीपंत कोटंबकार पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहसिक जनशक्ती संघटना व मित्र परिवाराच्या वतीने सेलू येथे राज्यस्तरीय शंकरपट व कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुरुवार १९ रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होईल. झडशी—वडगाव मार्गावरील संताजी सभागृहासमोर प्रकाश खडसे, धनराज खडसे व बालू सोनटक्के यांच्या शेतात सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सेलू येथे सलग तिसर्‍या वर्षी हा शंकरपट महोत्सव भरत असून यंदा १२ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
 
 
Gudi Padwa
 
या महोत्सवात ३५० फूट सेकंदाचा पट ‘अ’ व ‘ब’ गटात, तसेच १३०० फूट सेकंदाचा पट व जोडदाणीचा पट अशा विविध थरारक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. Gudi Padwa विशेष आकर्षण म्हणून धामणगाव रेल्वे येथील महिला धुरकरी श्रुती वाळके यांची उपस्थिती राहणार आहे. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खा. अमर काळे राहणार असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, आ. सुमित वानखेडे, आ. राजेश बकाणे तसेच माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 
 
या महोत्सवाचा समारोप २७ रोजी होणार असून वडसा येथील एकता नाट्य रंगभूमी यांच्या ‘थैमान’ या नाटकाच्या सादरीकरणाने महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. Gudi Padwa या राज्यस्तरीय शंकरपट व कृषी महोत्सवासाठी परिसरातील शेतकरी, बैलगाडा शौकीन व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक रविंद्र कोटंबकार व शंकरपट आयोजन समितीचे अध्यक्ष भूषण उर्फ बंटी वाघमारे यांनी केले आहे.