तेहरान,
mojtaba-khamenei-leaked-audio इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते, मोजतबा खामेनेई, अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यातून काही सेकंदांच्या फरकाने थोडक्यात बचावले. हे एका लीक झालेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगमधून उघड झाले आहे. ऑडिओ रेकॉर्डिंगनुसार, त्यांचे वडील आणि इराणचे माजी सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनेई , २८ फेब्रुवारी २०२६ रोजी 'ऑपरेशन एपिक फ्युरी'चा भाग म्हणून इस्रायलने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मारले गेले, परंतु मोजतबा वेळेवर इमारतीतून बाहेर पडून आपला जीव वाचवला.
ब्रिटिश वृत्तानुसार, हा लीक झालेला ऑडिओ १२ मार्च रोजी झालेल्या इराणच्या वरिष्ठ धर्मगुरू आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या कमांडर्सच्या अंतर्गत बैठकीतील आहे. बैठकीत, दिवंगत नेत्याच्या कार्यालयाचे प्रोटोकॉल प्रमुख मझाहर हुसैनी यांनी सांगितले की, मोजतबा खामेनेई त्यांच्या वडिलांसोबत इमारतीत होते, परंतु क्षेपणास्त्रे पडण्याच्या काही वेळ आधी ते काही कामासाठी अंगणात गेले होते. रेकॉर्डिंगमध्ये हुसैनी यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, देवाच्या इच्छेनुसार मोजतबा यांना काही कामासाठी बाहेर जावे लागले होते आणि ते परत येत होते. जेव्हा इमारतीवर क्षेपणास्त्रे आदळली, तेव्हा ते बाहेर होते आणि वरच्या मजल्यावर जात होते. mojtaba-khamenei-leaked-audio हल्ल्यानंतर लगेचच, इस्रायली ब्लू स्पॅरो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी त्या परिसराला लक्ष्य केले, ज्यात अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कुटुंबीय ठार झाले.
सौजन्य : सोशल मीडिया
वृत्तानुसार, किमान तीन क्षेपणास्त्रे डागण्यात आली: एक मुख्य निवासस्थानावर, दुसरे मोजतबा यांच्या वरच्या मजल्यावरील निवासस्थानावर आणि तिसरे त्यांचे मेहुणे मिस्बाह अल-हुदा बाघेरी कानी यांच्या घरावर. हल्ल्याच्या परिणामांचे वर्णन करताना हुसैनी म्हणाले की, इराणी लष्करप्रमुख मोहम्मद शिराझी यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले होते आणि केवळ काही किलो मांसामुळे त्यांची ओळख पटू शकली. दुसऱ्या एका क्षेपणास्त्राने बाघेरी कानी यांचे शीर धडापासून वेगळे केले. या हल्ल्यात मोजतबा खामेनेई यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाल्याचे वृत्त आहे, तर त्यांच्या पत्नी हद्दाद यांचा जागीच मृत्यू झाला. दिवंगत नेत्याचे दुसरे पुत्र, मुस्तफा खामेनेई आणि त्यांची पत्नी देखील सुखरूप बचावले. mojtaba-khamenei-leaked-audio लीक झालेल्या ऑडिओमुळे मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृती आणि ठिकाणाबद्दलच्या अटकळांना बळ मिळाले आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून ते सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत, ज्यामुळे त्यांच्या जखमांच्या तीव्रतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांनी एक पाय गमावला आहे, तथापि याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, इराणी नेत्याच्या प्रकृतीबद्दल अधिकाऱ्यांना खात्री नाही. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "अनेक लोक म्हणत आहेत की त्याचा चेहरा खूप विद्रूप झाला आहे. ते म्हणत आहेत की त्याने एक पाय गमावला आहे आणि त्याला गंभीर दुखापत झाली आहे. काहीजण तर त्याच्या मृत्यूविषयीही बोलत आहेत. आम्ही त्याला अजिबात पाहिलेले नाही." ते जिवंत आहेत की नाही हे आम्हाला माहीत नाही.