चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर प्राणघातक हल्ला

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
wife-attacked : माेहननगर परिसरात विकृत पतीने आपल्या पत्नीवर चाकूने सपासप वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. चारित्र्याच्या संशयातून हा प्रकार घडला असून, जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पाेलिसांनी आराेपी पतीला अटक केली आहे. आदित्य रमेश उईके (25, पांढराबाेडी, रामनगर) असे आराेपीचे नाव आहे.
 
 
nngp
 
 
 
 
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य आणि पत्नी मुस्कान उफर् गुनगुन उईके (20) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून काैटुंबिक वाद सुरू हाेता. मुस्कान ही गराेदर असल्याने बाळंतपणासाठी माेहननगर येथील आपल्या माहेरी आली हाेती. बाळंतपण हाेऊन 8 महिने उलटले तरी ती सासरी परतत नसल्याने आदित्य तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊ लागला हाेता. याच संशयातून त्यांच्यात वारंवार खटके उडत हाेते. मंगळवारी आराेपी आदित्यने मुस्कानला ाेन करून ‘आपण वाद मिटवूया आणि समेट करूया’ असे सांगून तिला भेटायला बाेलावले. ताे माेहननगर परिसरात तिला भेटण्यासाठी आला. दरम्यान दाेघांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली. यावेळी रागाच्या भरात आदित्यने चाकूने मुस्कानवर हल्ला केला. त्याने तिच्या चेहरा, गळा आणि डाेक्यावर गंभीर वार केले आणि तिथून पसार झाला. भरवस्तीत घडलेल्या या घटनेने माेहननगर परिसरात माेठी खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा ऐकून घटनास्थळी धाव घेतली आणि रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या मुस्कानला तातडीने मेयाे रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी फरार आराेपी आदित्य उईके याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नाेंदवण्यात आला.