महसूल खात्यात इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा

मंत्री बावनकुळे यांनी विधानपरिषदेत कबुली दिली

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
मुंबई
Chandrashekhar Bawankule महसूल खात्यातील नियमांचे मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याची गंभीर माहिती आज विधानपरिषदेत उघड झाली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात थेट कबुली देत सांगितले की, आतापर्यंतच्या इतिहासात महसूल खात्यात झालेला हा सर्वात मोठा घोटाळा आहे.
 

 , Chandrashekhar Bawankule statement 
या प्रकरणात जमिनीवरील सातबारा (7/12) उताऱ्यात शुद्धलेखनातील चुका दुरुस्त करण्याच्या नावाखाली बेकायदेशीर फेरफार करून काही महसूल अधिकाऱ्यांनी मालकी हक्कांमध्ये बदल केला, अशी माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली. त्यांनी स्पष्ट केले की, या प्रक्रियेत सुमारे एक ते दीड लाख शेतकऱ्यांना फसवले गेले असून या अनियमिततेमुळे राज्याच्या महसूल खात्यावर मोठा फटका बसला आहे.
ठाकरे गटाचे आमदार Chandrashekhar Bawankuleअनिल परब यांनी या गंभीर घटनेवर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, महसूल कायद्याच्या कलमांचा अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने वापर होतो आणि फेरफार प्रक्रियेत शेतकऱ्यांना अडचण येते. यावर मंत्री बावनकुळे म्हणाले की, कलम १५५ चा दुरुपयोग केला गेला असून, शुद्धलेखन दुरुस्त करण्याच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी बेकायदेशीर वापर झाला आहे.
मंत्र्यांच्या माहितीनुसार, प्रवीण घेडा यांच्या अहवालानुसार महसूल खात्यात अनेक अनियमितता उघडकीस आल्या आहेत. जुलै-ऑगस्ट २०२५ दरम्यान पुणे जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर आदेश पारित करून मालकी हक्क बदलले. यामध्ये मूळ मालकाची संमती नसतानाही सातबारा उताऱ्यात फेरफार करण्यात आले.
मंत्री बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले की, दोषींवर कारवाई होईल आणि पुढच्या ७ दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. “कोणताही अधिकारी मोठा असो, त्याच्यावरही कारवाई होईल. महसूल खात्यातील हा सर्वात मोठा घोटाळा असल्यामुळे आम्ही सर्वत्र तपासाचे आदेश दिले आहेत,” असे त्यांनी विधानपरिषदेत नमूद केले.
आमदार अनिल Chandrashekhar Bawankule परब यांनी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असून, सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार तहसीलदारांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत संपूर्ण कारवाई होणार आहे. या प्रकरणामुळे महसूल खात्यातील पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा एकदा राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे.