मुंबई,
Dhurandhar 2 movie बॉलिवूडमधील बहुप्रतीक्षित ‘धुरंधर 2’ हा चित्रपट प्रदर्शना आधीच चर्चेचा विषय ठरत आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या भव्य चित्रपटात दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार असून, अॅडव्हान्स बुकिंगपासून ते चित्रपटाच्या प्रचंड बजेटपर्यंत सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशातच आता चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाची माहिती समोर आली असून, त्यानेही सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंह यांनी सर्वाधिक मानधन घेतले आहे. त्यांना या चित्रपटासाठी तब्बल ५० कोटी रुपये देण्यात आले आहेत. या प्रचंड मानधनासह ते या चित्रपटातील सर्वात महागडे अभिनेता ठरले आहेत. रणवीर या चित्रपटात हमजा अली आणि जसकीरत सिंह रंगी अशा दमदार दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत.चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेले संजय दत्त यांनी आपल्या भूमिकेसाठी सुमारे १० कोटी रुपये मानधन घेतले आहे. तर अजय सान्यालची भूमिका साकारणारे आर. माधवन यांना जवळपास ९ कोटी रुपये देण्यात आल्याचे सांगितले जाते. दोन्ही कलाकारांच्या भूमिका कथानकासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे समजते. याशिवाय, खलनायक इलियास कश्मीरीची भूमिका साकारणाऱ्या अर्जुन रामपाल यांना तुलनेने कमी म्हणजे सुमारे १ कोटी रुपये मानधन मिळाल्याची माहिती आहे.
चित्रपटातील Dhurandhar 2 movie महिला मुख्य भूमिकेसाठी सारा अर्जुन यांची निवड करण्यात आली असून, त्यांनाही सुमारे १ कोटी रुपये मानधन मिळाले आहे. मोठ्या स्टारकास्टच्या तुलनेत ही रक्कम कमी असल्याची चर्चा रंगली आहे.
सुमारे २७५ कोटी रुपयांच्या Dhurandhar 2 movie भव्य बजेटमध्ये तयार झालेला ‘धुरंधर 2’ हा चित्रपट १८ मार्च २०२६ पासून पेड प्रीव्ह्यूद्वारे प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाला असून, १९ मार्च रोजी तो अधिकृतपणे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.दरम्यान, अॅडव्हान्स बुकिंगच्या आकडेवारीनुसार चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. ‘धुरंधर’ या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवले होते. त्यामुळे ‘धुरंधर 2’ हा चित्रपट त्यापेक्षाही मोठा विक्रम प्रस्थापित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चित्रपटाचा भव्य स्केल आणि कलाकारांचे मानधन पाहता, निर्मात्यांनी या चित्रपटाला मेगा ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी कोणतीही कसर ठेवलेली नाही, हे स्पष्ट होत आहे.