डोंगरगड येथे चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त रेल्वेची विशेष सुविधा

- भाविंकाच्या सोयीसाठी गाड्यांचे तात्पुरते थांबे व विशेष व्यवस्था

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
गोंदिया, 
special-railway-facilities : सीमावर्ती छतीसगड राज्यातील डोंगरगड येथील प्रसिद्ध माँ बम्लेश्वरी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र नवरात्रोत्सव गुरुवार १९ मार्च ते २७ मार्च २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या काळात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असल्याने त्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत विविध गाड्यांना डोंगरगड स्थानकावर तात्पुरते थांबे देण्याची तसेच काही गाड्यांचा विस्तार करण्याची सुविधा जाहीर केली आहे.
 
 
k
 
 
 
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बिलासपूर-भगत की कोठी एक्सप्रेस (२०८४३) ही २३ व २४ मार्च रोजी रात्री ९.५६ वाजता येऊन ९.५८ वाजता सुटणार आहे. तसेच भगत की कोठी-बिलासपूर एक्सप्रेस (२०८४४) ही २६ मार्च रोजी पहाटे ५.४० वाजता येऊन ५.४२ वाजता प्रस्थान करेल. याशिवाय बिलासपूर-बीकानेर (२०८४५) आणि बीकानेर-बिलासपूर (२०८४६) या एक्सप्रेस गाड्यांनाही अनुक्रमे १९, २१ आणि २२, २४ मार्च रोजी थांबे देण्यात आले असून, त्यांच्या वेळाही निश्चित करण्यात आल्या आहेत. बिलासपूर-चेन्नई (१२८५१) व चेन्नई-बिलासपूर (१२८५२) एक्सप्रेस गाड्याही अनुक्रमे २२ व २३ मार्च रोजी थांबणार आहेत. पुणे-बिलासपूर (१२८५०) आणि बिलासपूर-पुणे (१२८४९) एक्सप्रेस गाड्यांना १९ ते २६ मार्च दरम्यान विविध दिवशी थांबे देण्यात आले आहेत. तसेच रायपूर-सिकंदराबाद (१२७७२) व सिकंदराबाद-रायपूर (१२७७१) एक्सप्रेस गाड्याही ठराविक दिवशी डोंगरगड स्थानकावर थांबतील. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे नवरात्रोत्सव काळात डोंगरगड येथे येणार्‍या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सुलभ होणार आहे. यात्रेकरूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही रेल्व प्रशासनाकडून करण्यात आले आहे.