'मशाल' सोडून हाती घेतला 'धनुष्यबाण'

जिल्हाप्रमुखांसह चार नगरसेवक शिवसेनेत

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
अकोला,
district chief join shiv sena महानगरपालिकेच्या नुकताच झालेल्या निवडणुकीत 'उबाठा' गटाकडून निवडून आलेल्या सहापैकी चार नगरसेवक व जिल्हाप्रमुख यांनी 'मशाल' सोडून आता धनुष्यबाण हातात घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी बुधवारी मध्यरात्री दोन वाजता हा पक्षप्रवेश पार पडला.या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
 

शिव सेना  
 
 
८० नगरसेवक असलेल्या अकोला महानगरपालिकेत उबाठा गटाचे सहा नगरसेवक विजयी झाले.शिवाय एक स्वीकृत सदस्य देखील वाट्याला आल्याने नगरपालिकेत क्रमांक तीन चा पक्ष हा उबाठा ठरला.मात्र हे समीकरण अवघ्या पंधरा दिवसात होत्याचे नव्हते झाले. नगरसेवक मनोज पाटील, सोनल सरोदे, सुरेखा काळे, सागर भारुका यांच्यासह उबाठाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनी देखील पक्षाला रामराम करीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर आता महापालिकेतील उभाटा गटाचे संख्याबळ देखील घटले असून विजय इंगळे, अभय खुमकर व स्वीकृत नगरसेवक शंकर लंगोटे हे तीन नगरसेवक आता उबाठाकडे असणार आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेतील उबाठा गटाच्या नगरसेवकांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू होते या पक्षप्रवेशाने अखेर त्याला पूर्णविराम मिळाला आहे.
आमदार नितीन देशमुख यांना धक्का
महानगरपालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी उबाठाचे आमदार तथा उपनेते नितीन देशमुख यांनी जोरदार मोर्चेबांधणी करून सहा नगरसेवक निवडून आणले यापैकी आता चार नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. याशिवाय गोपाल दातकर व मंगेश काळे हे दोन जिल्हाप्रमुख उबाठाचे आहेत.district chief join shiv sena यापैकी मंगेश काळे यांनी देखील धनुष्यबाण हाती घेतल्याने.उबाठा गटाच्या ग्रामीण व शहरी कार्यकर्त्यांवर याचा परिणाम होणार असल्याने हा आमदार नितीन देशमुख यांना मोठा धक्का मानला जात आहे.