गॅस सिलेंडर काळाबाजार राेखण्यासाठी ‘ओटीपी’प्रभावी

- पाेलिस अधिकाऱ्याच्या संकल्पनेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
gas cylinder otp effective पूर्वी एजन्सीशी संगनमत करुन गॅस सिलेंडर कुणालाही बुक करता येत हाेते. त्यामुळे सबसिडीमध्ये मिळणाऱ्या गॅस सिलेंडरचा गैरवापर वाढला हाेता. ही बाब एका पाेलिस अधिकाऱ्याला खटकली. संपूर्ण देशभरात बदल घडविण्यासाठी त्या पाेलिस अधिकाऱ्याने केंद्र आणि राज्य सरकारकडे ई-मेल आणि पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला. शेवटी सरकारने ‘ओटीपी’ प्रणाली लागू करण्यात आली. रितेश आहेर असे पहिल्यांदाच ‘ओटीपी’ संकल्पना मांडणाऱ्या पाेलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.

gas cylinder otp effective 
 
 
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धपरिस्थितीमुळे इंधन व गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना घरगुती एलपीजी सिलेंडरचा तुटवडा भासू नये आणि काळाबाजाराला आळा बसावा यासाठी गॅस सिलेंडर वितरणात ‘वन टाइम पासवर्ड (ओटीपी)’ प्रणाली महत्त्वाची ठरत आहे.
 
ही प्रणाली प्रभावीपणे राबविण्याबाबत नागपूर पाेलिस दलातील अधिकारी रितेश आहेर यांनी काही वर्षांपूर्वी केलेले संशाेधन आणि सूचना आता अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टाेळ्या नागरिकांना बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक करीत असल्याच्या घटना वाढल्या हाेत्या. या फसवणुकीतून मिळालेला काळा पैसा गॅस सिलेंडर बुकिंग किंवा माेबाईल रिचार्जद्वारे पांढरा करण्याचा प्रकार सायबर गुन्हेगार करीत असल्याचे समाेर आले हाेते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पाेलिस निरीक्षक रितेश आहेर यांनी गॅस कंपन्यांशी पत्रव्यवहार करून सिलेंडर वितरणात ‘ओटीपी’प्रणाली लागू करण्याच्या सूचना केल्या हाेत्या. ओटीपी प्रणालीमुळे सिलेंडर देताना ग्राहकाच्या माेबाईलवर आलेला काेड देणे अनिवार्य हाेते. त्यामुळे बनावट बुकिंग थांबली. दुसèयाच्या नावावर सिलेंडर उचलणे बंद झाले हाेऊन काळाबाजार थांबल्याचे समाेर आले.
 
 
‘ओटीपी’ प्रणालीमुळे पारदर्शकता
‘ओटीपी’ प्रणालीमुळे एका ग्राहकाच्या नावावर एकच सिलेंडर वितरण सुनिश्चित करता येते. ग्राहकाच्या माेबाईलवर ‘ओटीपी’ आल्याशिवाय सिलेंडरची डिलिव्हरी शक्य नसल्याने वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढली आहे.gas cylinder otp effective यामुळे अनेक ठिकाणी गॅस एजन्सी आणि सायबर गुन्हेगारी यांच्यातील संभाव्य गैरप्रकारांवर नियंत्रण मिळविण्यास मदत झाली असल्याचे समाेर आले आहे.
राष्ट्रीय स्तरावर मान्यता
पाेलिस अधिकारी रितेश आहेर यांनी केलेल्या या संशाेधनाची आणि तपास पद्धतीची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. ‘सीसीटीएनएस हॅकेथाॅन’ स्पर्धेत त्यांच्या संकल्पनेला तिसरा क्रमांक मिळाला. तसेच महाराष्ट्र पाेलिसांना ‘सीएआय सायबर सिक्युरिटी अवार्ड’(2023) ने गाैरविण्यात आले. सायबर गुन्हेगारी राेखण्यासाठी केलेल्या नवकल्पनांमुळे महाराष्ट्र पाेलिसांची कार्यपद्धती देशभरात चर्चेत आली आहे.