अनिल कांबळे
नागपूर,
yashwant stadium for pay and park धंतोली ज्येष्ठ नागरिक मंडळाची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्या. अनिल किलोर आणि न्या. राज वाकोडे यांच्या खंडपीठाने पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक उपयोग करणाऱ्या रुग्णालयांकडून बाजारभावाच्या चौपट दंड आकारण्याचे आदेश दिले. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) मध्यस्थी अर्ज दाखल करत यशंवत स्टेडियमच्या आतील जागा आणि पंचशील चौकातील घटाटे इमारती जवळील जागा पे अॅण्ड पार्क तत्वावर देण्याची विनंती केली आहे.
सुनावणीदरम्यान, पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या रुग्णालयांना पाठिंबा देणार नसल्याचे आयएमएने मौखिकपणे स्पष्ट केले आहे. परंतु यशवंत स्टेडियम बंद असेपर्यंत या जागेचा उपयोग करू देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान धंतोली, रामदासपेठ आणि काँग्रेसनगर परिसरातील वाहतूककोंडी व पार्किंगच्या समस्येवर नागपूर खंडपीठाने आक्रमक भूमिका घेत, ही समस्या धंतोलीपुरती मर्यादित नसून संपूर्ण शहराची असल्याचे मौखिक निरीक्षण नोंदवले होते. अनेक रुग्णालये पार्किंगच्या जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करीत असल्याचे म्हटले होते.yashwant stadium for pay and park तसेच जनहित याचिकेची अंमलबजावणी धंतोली व रामदासपेठपुरती न ठेवता शहरात लागू करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. आशुतोष धर्माधिकारी व अॅड. अश्विन देशपांडे, मनपातर्फे अॅड. जेमिनी कासट तर सरकारतर्फे अॅड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.