शहीद पुर्वेश दुरुगकरांना श्रद्धांजली

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Good Morning Club Gandhibagh गुड मॉर्निंग क्लब गांधीबाग व मित्र परिवाराच्या वतीने गांधीबाग बगिच्यात शहीद फ्लाइट लेफ्टनंट पुर्वेश रविंद्र दुरुगकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
 

boby 
 
 
आसाम येथे सुखोई विमानाच्या सरावादरम्यान ६ मार्च रोजी झालेल्या दुर्घटनेत त्यांचे निधन झाले होते. ७ मार्च रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले होते. Good Morning Club Gandhibagh श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच “शहीद पुर्वेश दुरुगकर अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी प्रार्थनाही करण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:राजेश हरडे,संपर्क मित्र