क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन साजरा

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Hanumannagar Zone महानगरपालिका, हनुमाननगर झोनच्या समाज कल्याण विभागांतर्गत जानवी महिला वस्ती स्तर संघ व जागृती महिला वस्ती स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त हनुमान मंदिर येथे सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
 
yamini
 
 
कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाच्या समूह संघटक ज्योत्स्ना देशमुख, नीता गोतमारे, नगरसेविका पायलट मॅडम, मस्के मॅडम, सिमले मॅडम, समुपदेशिका करिश्मा धावडे तसेच पोलीस अधिकारी व पोलीस दीदी उपस्थित होत्या.यावेळी बचत गटातील महिलांनी फॅशन शो, नृत्य, लावणी तसेच शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारी नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. .Hanumannagar Zone सर्व महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन माधुरी धुर्वे यांनी केले. जागृती ALF च्या रंजना वागदे, रीता गजभिये, निर्मला सहारे, माधुरी धुर्वे तसेच जानवी ALF च्या सुरेखा कढव, शीतल घोडेस्वार, छबिता खोब्रागडे, वैशाली ठाकरे व सर्व बचत गट अध्यक्ष, सचिव आणि सदस्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
 
सौजन्य:यामिनी ठेवले,संपर्क मित्र