नवी दिल्ली,
rajpal-yadav-in-cheque-bounce-case प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव सध्या कायदेशीर अडचणींचा सामना करत आहे. दिल्ली उच्च न्यायालयात एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली, ज्यात न्यायालयाने त्याला सध्या तुरुंगात न पाठवण्याचा निर्णय देऊन मोठा दिलासा दिला. सुनावणीदरम्यान अभिनेता स्वतः उपस्थित होता आणि आपली बाजू मांडताना त्यानी सांगितले की, त्यानी आधीच मोठी रक्कम भरली आहे.
सुनावणीच्या सुरुवातीला, राजपाल यादवच्या वकिलांनी न्यायालयाला माहिती दिली की, त्यानी नियमित जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. rajpal-yadav-in-cheque-bounce-case तसेच, न्यायालयाला कळवण्यात आले की अभिनेत्याचा अंतरिम जामीन आज संपत आहे. पैसे भरण्याबाबत वकिलांनी सांगितले की, आतापर्यंत मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडला ४.२५ कोटी रुपये दिले गेले आहेत आणि २५ लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट आज सादर केला जात आहे. अभिनेत्याने मोठी रक्कम भरल्यामुळे त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवले जाणार नाही, असे सांगून न्यायालयाने समाधान व्यक्त केले.
सुनावणीदरम्यान, न्यायाधीशांनी राजपाल यादवला सावध राहण्याचा आणि नंतर स्वतःसाठी हानिकारक ठरेल असे काहीही न बोलण्याचा सल्ला दिला. rajpal-yadav-in-cheque-bounce-case न्यायालयाने स्पष्ट केले की, जर त्याने पैसे परत केले तर खटला रद्द केला जाईल, अन्यथा त्याला सुनावणीसाठी तयार राहावे लागेल. न्यायालयाने आता पुढील सुनावणी ३० मार्च रोजी निश्चित केली आहे.