रुग्णालयांकडे पाणीपट्टीचे एक कोटी रुपये थकले

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
गडचिरोली, 
water bills मार्च अखेरच्या पृष्ठभूमीवर गडचिरोली नगर परिषदेने पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. मात्र, या वसुलीत सर्वांत मोठा अडथळा सरकारी रुग्णालयांच्या थकबाकीचा ठरत आहे. शहरातील जिल्हा रुग्णालय आणि महिला व बाल रुग्णालयाकडे पाणीपट्टीची तब्बल एक कोटी चार लाख रुपयांची थकबाकी असून, या मोठ्या रकमेमुळे नगर परिषदेचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अत्यावश्यक सेवा असल्याने रुग्णालयांचा पाणीपुरवठा खंडित करणे कठीण झाले आहे.
 

रुग्णालयांकडे पाणीपट्टीचे एक 
 
 
गडचिरोली नगर परिषद शहरात सुमारे सात हजार कुटुंबांना पाणीपुरवठा करते. वैनगंगा नदीतून पाणी उचलणे, त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करणे, मनुष्यबळ आणि वीज बिलावर दरमहा लाखो रुपयांचा खर्च होतो. हा खर्च पाणीपट्टीतून निघणे अपेक्षित आहे. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून नगर परिषद प्रति नळ प्रति वर्ष केवळ 1 हजार 800 रुपये आकारणी करते. मात्र, इतकी माफक रक्कमही अनेक नळधारक भरत नसल्याने नगर परिषदेच्या तिजोरीवर मोठा भार पडत आहे.
चालू आर्थिक वर्षात नळधारकांकडून एकूण 3 कोटी 12 लाख रुपयांच्या पाणीपट्टीची मागणी आहे.water bills मात्र, आतापर्यंत केवळ 1 कोटी 35 लाख रुपये (43.31 टक्के) वसुली झाली आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी तत्काळ पाणीपट्टी भरण्याचे आवाहन नगर परिषदेने केले आहे.
.
पाणीपट्टी भरा; अन्यथा नळ कनेक्शन कापणार!
मार्च महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक असताना नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने वसुलीसाठी कंबर कसली आहे. शहराची पाणीपट्टी वसुली केवळ 43.31 ट्न्नङ्मांवर पोहोचल्याने प्रशासनाने आता आक्रमक धोरण अवलंबले असून, थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कापण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.