मुलीने वृद्ध वडिलांना पोत्यात भरून पार्सल पाठवले; कुरिअर उघडताच...VIDEO व्हायरल

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
बंगळुरू,  
human-parcel-viral-case-in-bengaluru बंगळुरूमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेत आली आहे. सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीजण कोणत्या टोकाला जातात, याचे हे गंभीर उदाहरण ठरले आहे. एका कुटुंबाने विचित्र प्रयोग करत एका वृद्ध व्यक्तीला मोठा बॉक्समध्ये बंद करून कुरिअर कार्यालयात नेले, ज्यामुळे तेथे एकच खळबळ उडाली.
 
human-parcel-viral-case-in-bengaluru
 
ही घटना उघडकीस आली तेव्हा कुरिअर कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी मोठा बॉक्स उघडून पाहिली. आत एका महिलेचे वडील असल्याचे दिसताच सर्वांनाच धक्का बसला. human-parcel-viral-case-in-bengaluru तपासात असे समोर आले की, त्या महिलेबरोबर तिचा पती, सासू आणि दीर या सर्वांनी मिळून हा प्रकार केला होता. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, रमजान आणि उगादी सणांच्या काळातील प्रवासाची अडचण दाखवण्यासाठी ते एक व्हिडिओ तयार करत होते. या काळात बसमध्ये तिकिटे मिळणे कठीण जाते, हे दाखवण्यासाठी त्यांनी माणसालाच पार्सलसारखे पाठवण्याचा प्रयोग केला.
सौजन्य : सोशल मीडिया 
मात्र, बॉक्स बराच वेळ राहिल्याने त्या वृद्धांची प्रकृती बिघडली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे स्पष्ट दिसत होते. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदत केली. तरीही कुटुंबीयांनी आपले पार्सल स्वीकारण्याचा आग्रह धरत कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचेही समोर आले. human-parcel-viral-case-in-bengaluru घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि संबंधित सर्वांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर कुटुंबीयांनी आपली चूक मान्य करत माफी मागितली. पोलिसांनी त्यांना कठोर इशारा देत भविष्यात अशा जीवाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकारांपासून दूर राहण्यास सांगितले आणि पुढील कारवाईनंतर सोडून दिले. या घटनेमुळे प्रसिद्धीसाठी केले जाणारे अतिरेकी प्रयत्न किती धोकादायक ठरू शकतात, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.