21 एप्रिलपासून बेमुदत संप; शासनाला दिले निवेदन

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
indefinite-strike-from-april-21 : सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, नगर पालिका कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासन सतत दुर्लक्ष करीत असल्याने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या समन्वय समितीने येत्या शनिवार, 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
y18March-Notice
 
 
 
त्यासंदर्भात जिल्हाधिकाèयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत जाहीर मान्यता देऊनही पेन्शनच्या मुद्यावर शासनाची चुप्पी असून यापूर्वी 6 मार्च, 20 मे, 9 जुलै, 11 नोव्हेंबर, 5 डिसेंबर, 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर साखळी डिसेंबर, 12 फेब्रुवारी अशा विविध आंदोलनातून शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे.
 
 
मात्र याबाबत शासनाची नकारात्मक भूमिका कायम असल्याने हा बेमुदत संप असल्याचे संघटनेचे मत आहे. यवतमाळ येथे देण्यात आलेल्या निवेदनाचे वेळी नंदकुमार बुटे, मंगेश वैद्य, संदीप मोहाडे, महेश सोनोने, प्रफुल फुंडकर, राजेंद्र गावंडे, गौरव आगाशे, अजय गौरकर, श्याम मॅडमवार, गोपाळ गायकवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.