मला फोन कर; अबरार प्रकरणात ललित मोदीने काव्या मारनला दिला मदतीचा प्रस्ताव

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
lalit-modi-offers-help-to-kavya-maran 'द हंड्रेड' या इंग्लिश क्रिकेट लीगमध्ये पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदला खरेदी केल्याबद्दल सनरायझर्स लीड्स आणि त्याची मालक काव्या मारन यांच्यावर टीका होत आहे. भारतीय सोशल मीडियाच्या एका मोठ्या वर्गाने भारतीय मालकीच्या फ्रँचायझीने पाकिस्तानी खेळाडूच्या खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इतकेच नाही तर, महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी या विषयावर तीव्र टीका केली आहे. मिड-डेमधील आपल्या स्तंभात त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानी खेळाडूंना मानधन देणे म्हणजे भारतीयांच्या मृत्यूला हातभार लावण्यासारखे आहे. दरम्यान, आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदीने काव्या मारनला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी 'मदत' करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मारनला लक्ष्य करणाऱ्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यानी काव्या मारनला फोन करण्याचे आवाहन केले आहे.
 
lalit-modi-offers-help-to-kavya-maran
 
'द हंड्रेड'च्या लिलावात, भारतीय मालकीच्या सनरायझर्स लीड्स या फ्रँचायझीने पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदला १,९०,००० पाउंडमध्ये खरेदी केले. अशाप्रकारे अबरार अहमद लीगमध्ये भारतीय मालकीच्या फ्रँचायझीने खरेदी केलेला पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला. lalit-modi-offers-help-to-kavya-maran यामुळे भारतातील सोशल मीडियावर खळबळ उडाली. संतप्त वापरकर्त्यांनी या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबादवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंडही सुरू केला. सन टीव्ही नेटवर्कच्या कार्यकारी संचालक आणि सनरायझर्स लीड्सच्या सह-मालक काव्या मारन यांच्यावर सोशल मीडियावर तीव्र टीका होत होती. दरम्यान, सनरायझर्सचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी म्हणाले की, आणखी एक पाकिस्तानी फिरकी गोलंदाज, उस्मान तारिक, देखील त्यांच्या रडारवर आहे.
सोशल मीडियावरील या संतापाच्या पार्श्वभूमीवर, आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी इंस्टाग्रामवर काव्या मारन यांना एक संदेश पोस्ट केला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मोशन ग्राफिक्सचा वापर केला, ज्यात लिहिले होते, "चाहते आधीच संतप्त असताना एका पाकिस्तानी खेळाडूवर २३.४ दशलक्ष रुपये गुंतवायचे? लोकांचे मत कसे सांभाळावे आणि साम्राज्य कसे उभारावे हे मला चांगलेच माहीत आहे. lalit-modi-offers-help-to-kavya-maran मला फोन कर." ललित मोदी यांनी पोस्टला कॅप्शन दिले, "'द हंड्रेड'मधील खेळाडूंवरून सनरायझर्स लीड्स वादात सापडले आहे."