देशातील पहिल्या समलैंगिक खासदार ठरल्या मेनका गुरुस्वामी

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Maneka Guruswamy first gay MP वरिष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांनी भारतीय राजकारणात ऐतिहासिक पाऊल टाकत राज्यसभेत प्रवेश केला आहे. समलैंगिक समुदायातून संसदेत पोहोचणाèया त्या पहिल्या सदस्य ठरल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने त्यांना पश्चिम बंगालमधून उमेदवारी दिली होती आणि ३७ पैकी २७ जागांवर झालेल्या बिनविरोध निवडीतही त्यांचे नाव होते. उर्वरित ११ जागांसाठी ही निवडणूक पार पडली आणि या प्रक्रियेनंतर गुरुस्वामी यांची निवड झाली.
 
 
 
Maneka Guruswamy
 
 
मेनका गुरुस्वामी यांचे शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठ, हार्वर्ड लॉ स्कूल आणि बंगळुरूच्या नॅशनल लॉ स्कूूल ऑफ इंडिया यासारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांमध्ये झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या घटना, लोकशाही आणि नागरिकांच्या मुलभूत हक्कांवर काम करत आहेत. २०१८ मधील सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला. या प्रकरणात गुरुस्वामी आणि त्यांची सहकारी अरुंधती काटजू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या निकालात १८५ वर्षांपासून अस्तित्वात असलेला समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारा कायदा रद्द करण्यात आला. हा निर्णय समलैंगिक समुदायासाठी मोठा विजय मानला जातो आणि भारतातील सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.