नागपूर,
Janaki Nagar Hindu Sammelan नागपूरमधील शिवशक्ती नगर, श्री हनुमान मंदिर परिसर येथे १४ व १५ मार्च रोजी अयोध्या भागातील जानकी नगर वस्तीच्या वतीने आयोजित भव्य हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे मिश्रण पाहायला मिळाले. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजन, गोमाता पूजन व आरतीने झाली, ज्यामुळे परिसरात राष्ट्रभक्ती व आध्यात्मिकतेचा संगम अनुभवायला मिळाला. संत गजानन महाराजांचे पारायण, भजन व विविध धार्मिक विधींनी संमेलनाला भक्तिमय रंग आणला. दुसऱ्या दिवशी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे परिसरात उत्साहाचे व धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले.

सन्मेलनात लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा “हिंदू सण” या विषयावर आयोजित करण्यात आली, तर रांगोळी स्पर्धा “हिंदू सण आणि परंपरा / महापुरुष गाथा” या विषयावर झाली. पथनाट्य स्पर्धेत पंच परिवर्तन या संकल्पनेवर आधारित नागरी कर्तव्य, पर्यावरण संवर्धन, स्वदेशीचा आग्रह, कुटुंब प्रबोधन आणि सामाजिक समरसता या विषयांवर सादरीकरण झाले. तसेच वक्तृत्व स्पर्धा “हिंदू एकतेत मातृशक्तीची भूमिका” या विषयावर मुलं, तरुणी व महिला यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतले. Janaki Nagar Hindu Sammelan मुख्य अतिथी संत महादेव महाराज (आनंद गड), महिला वक्ता प्रा. कीर्ती कालमेघ (वनकर) आणि प्रमुख वक्ते श्रीकांत चितळे यांनी उपस्थितांना पंच परिवर्तनाद्वारे सामाजिक बदलाची गरज स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक व्यक्ती स्वतःपासून सुरूवात करेल, तर सामाजिक समरसता, पर्यावरण संवर्धन, नागरी कर्तव्य पालन, स्वजागरण आणि कुटुंब प्रबोधन यांच्या माध्यमातून समाजाचा विकास साधता येईल. प्रा. कीर्ती वनकर यांनी मुलांवर संस्कार करताना पालकांनी आपल्या सवयींवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व सांगितले, कारण मुलं आई-वडिलांकडून शिकतात. संत महादेव महाराज यांनी संमेलनासाठी आशिर्वचन दिले.
कार्यक्रमाचे संचालन संजय पळसकर यांनी प्रभावीपणे केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन महिला संयोजक मंजुषा गायधने यांनी केले. प्रास्ताविक महीन सपकाळ यांनी केले. विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक योगदान दिल्यामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वी झाला. संमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रदीप गणोरकर, अभिलाष लिखणकर, उकंडराव चौधरी, गजानन शेळके, मदन व र्हाडे, राजेश वाघाडे, भालचंद्र दाणी, गजानन कोहळे, डॉ. राजेश कुराडे, अथर्व धारूडकर, पराग धर्माधिकारी, नरेंद्र खराबे, विकास हिंगे, किशोर बुराडे, अविनाश गणोरकर, संजय गाडगे, दीपक डुमरे, आकाश वाघाडे, पुष्कर आगाशे, शुभम बुराडे, कार्तिक गणोरकर, बाळू अंभोरे, यश ठाकरे, आयुष ठाकरे, अनिता वाघाडे, पूजा वाघाडे, दिगांबर गेडाम, अबोली घडोले, सुवर्णा नांदुरकर, रंजना चट्टे, सीमा भारद्वाज, तारिका मेश्राम, मेघा गणोरकर आणि जानकी नगर वस्तीतील सर्व नागरिक बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले. Janaki Nagar Hindu Sammelan संमेलनाच्या माध्यमातून समाजात एकता, संस्कार, राष्ट्रीय भावना व सामाजिक बांधिलकी दृढ करण्याचा संदेश देण्यात आला आणि नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. आयोजकांनी भविष्यात अशा उपक्रमांमुळे समाजजागृती अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र