हस्तकला हातमाग मेळ्यात विणकरांसाठी कार्यशाळा संपन्न

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Mor Bhavan Birdie सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, मोर भवन येथे सुरू असलेल्या हस्तकला हातमाग मेळा २०२६ अंतर्गत विणकर कारागिरांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत कारागिरांनी आपली कौशल्ये व कल्पना मांडल्या.

mm  
 
 
चंदेरीचे ज्येष्ठ विणकरानीं इतर कारागिरांनी मार्गदर्शन केले. प्रदर्शनाचे प्रभारी अरविंद शर्मा यांनी विणकरांना प्रोत्साहन देणे व त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले.Mor Bhavan Birdieया मेळ्यात मध्य प्रदेशातील चंदेरी, रेशीम व इतर हस्तकला उत्पादने उपलब्ध असून सुमारे ४५ ते ५० कारागीर सहभागी झाले आहेत. दररोज दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत हे प्रदर्शन  सुरु आहे . 
 
सौजन्य: निकिता लुटे,संपर्क मित्र