शहरात ट्रॅव्हल्स बसेसला ‘नाे एन्ट्री’

- इनर रिंगराेड परिसरात सकाळी 8 ते रात्री 10 बंदी

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
travel buses शहरातील दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक काेंडी, प्रदूषण आणि अपघातांचा धाेका लक्षात घेता, पाेलिस उपायुक्त लाेहित मतानी यांनी खासगी ट्रॅव्हल्स बसेसवर शहरात प्रवेश करण्यास आणि पार्किंग करण्यास कडक निर्बंध लादले आहेत. या नव्या अधिसूचनेनुसार, शहरातील इनर रिंगराेड परिसरात सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत खासगी ट्रॅव्हल्सना पार्किंग, प्रवाशांची पिकअप-ड्राॅप करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
 

travel buses 
 
शहराची लाेकसंख्या अंदाजे 30 लाखांपेक्षा जास्त असून रस्त्यांवर सुमारे 25 लाख वाहने धावत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील सीए राेड, व्हरायटी चाैक, काॅटन मार्केट आणि वर्धा राेड यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर खासगी ट्रॅव्हल्स अनधिकृतपणे प्रवाशांची ने-आण करतात. या माेठ्या बसेसमुळे वाहतूक काेंडीत भर पडत असून ध्वनी आणि वायू प्रदूषणही वाढत आहे. या संदर्भात लाेकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अनेक तक्रारींची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, शहरातून विविध मार्गांनी दरराेज शेकडाे खासगी ट्रॅव्हल्स ये-जा करतात. यात वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूरकडे जाणाèया सुमारे 642 बसेसचा समावेश आहे. तर पुणे, नाशिककडे सुमारे 190 बसेस, इंदूर, भाेपाळकडे सुमारे 374 बसेस तर गडचिराेली आणि ब्रह्मपुरीकडे 308 बसेसचा यात समावेश आहे.travel buses बहुतेक ट्रॅव्हल्सकडे स्वत:ची पार्किंग जागा नसल्याने ते रस्त्यावरच अवैध पार्किंग करतात, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांना आणि चाकरमान्यांना त्रासाला सामाेरे जावे लागते. शहराबाहेर प्रवाशांना जाण्यासाठी मेट्राे, टॅक्सी आणि रिक्षा यांसारख्या पर्याची सुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे ट्रॅव्हल्सनी शहराबाहेरूनच परिचलन करणे आवश्यक आहे. ही अधिसूचना पुढील वर्षी 12 मार्च 2027 पर्यंत अंमलात राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाèयांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या वाहनांना मुभा
काही विशिष्ट सेवांना या नियमातून सवलत देण्यात आली आहे, मात्र त्यासाठी वाहतूक पाेलिस कार्यालयाची परवानगी आवश्यक राहणार आहे. यात एस.टी. महामंडळाच्या बसेस, मिहान आणि एमआयडीसीमधील कर्मचारी वाहतूक करणाऱ्या बसेस, रुग्णवाहिका, शालेय बसेस आणि आपत्कालीन सेवा, विवाह समारंभ, ज्येष्ठ नागरिक आणि महिला स्पेशल बसेसचा समावेश आहे.