पॅन्थर सेना महाराष्ट्र प्रदेश बैठक पार पडली

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Panther Army Maharashtra पॅन्थर सेना महाराष्ट्र प्रदेशची बैठक नुकतीच प्रदीप मानवटकर यांच्या राहत्या घरी पार पडली. या बैठकीत पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आनंद खापर्डे अध्यक्षस्थानी होते, तर महेंद्र रामटेके प्रमुख उपस्थित होते. यावेळी आनंद खापर्डे यांच्या हस्ते अर्चना उर्फ रेशम भोयर यांची पॅन्थर सेनेच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षपदी पुष्पगुच्छ देऊन नियुक्ती करण्यात आली.
 
nagpur
 
तसेच विविध पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सिद्धार्थ गोंडाने, कोषाध्यक्षपदी प्रदीप मानवटकर, नागपूर शहराध्यक्षपदी अखिलेश सरवरिया, शहर कार्यकारी अध्यक्षपदी दादाराव मोहोड, विदर्भ प्रदेश सचिवपदी विट्ठल ऊके, नागपूर शहर महिला आघाडी प्रमुखपदी सरिताताई मानवटकर तसेच राष्ट्रीय सल्लागारपदी विलास मनोहर यांची नियुक्ती महेंद्र रामटेके यांनी केली. Panther Army Maharashtra या बैठकीस अमृतपाल बामरा यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र रामटेके यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदीप मानवटकर यांनी मानले. शेवटी आनंद खापर्डे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र