वाहनमालकाला शाेधून परत केले 1.14 लाख रुपये

- वाहतूक पाेलिसांची कर्तव्य तत्परता

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
traffic polices रस्त्याच्या कडेला बेवारस असलेली दुचाकी सक्करदरा वाहतूक पाेलिसांनी टाेईंग व्हॅनने उचलून वाहतूक शाखेत जमा केली. तीन-चार दिवसानंतरही वाहनमालक न आल्यामुळे पाेलिसांनी दुचाकीच्या डिक्कीतील कागदपत्रे शाेधली. डिक्कीत 1 लाख 14 हजार रुपये हाेते. पाेलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरुन मालकाचा शाेध घेऊन त्याला पैसे आणि दुचाकी परत केली. वाहतूक पाेलिसांच्या कार्यतत्परतेमुळे पाेलिसांनी प्रतिमा उजळली आहे.
 


ट्रॅफिक पोलीस 
 
 
चंद्रशेखर काेसारकर (42) हे हुडकेश्वर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील चक्रपाणीनगरात राहतात. ते बैद्यनाथ चाैकातील एका खासगी बँकेत लिपिक पदावर कार्यरत आहेत. 9 मार्चला त्यांनी दुचाकी एका दुकानासमाेर उभी केली हाेती. काही सामान विकत घेण्यासाठी ते दुकानात गेले. काही वेळानंतर दुचाकी नव्हती. त्यामुळे घाबरलेल्या चंद्रशेखर यांनी विचारपूस केली. मात्र, कुणीही प्रतिसाद दिला नाही. यादरम्यान, दुसऱ्या दिवशी ती दुचाकी उंटखाना चाैकासमाेरील रस्त्याच्या कडेला उभी हाेती. वाहतुकीला अडथळा हाेत असल्यामुळे वाहतूक पाेलिस हवालदार बालकराम काकडे यांनी दुचाकी टाेईंग व्हॅनमध्ये टाकली आणि सक्करदरा वाहतूक शाखेत जमा केली. तीन ते चार दिवसांनंतरही दुचाकीचा मालक न आल्यामुळे बालकराम यांनी वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अतूल माेहनकर यांना माहिती दिली. त्यांनी दुचाकीची पाहणी केली. दुचाकी मालकाचा शाेध घेण्यासाठी दुचाीच्या डिक्कीतील कागदपत्रांची तपासणी केली असता त्यात 1 लाख 14 हजार रुपये दिसले.traffic polices त्यांनी दुचाकीच्या क्रमांकावरुन शाेध घेतला असता चंद्रशेखर काेसारकर यांची माहिती मिळाली. त्यांना माेबाईल क्रमांक मिळवून बाेलावण्यात आले. त्यांनी हुडकेश्वर पाेलिस ठाण्यात दुचाकी हरविल्याची तक्रार दिली हाेती.
पैशासह दुचाकी केली परत
वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अतुल माेहनकर यांच्या मार्गदर्शनात बालकराम काकडे आणि अन्य कर्मचाèयांनी दुचाकी मालक चंद्रशेखर यांना दुचाकी आणि 1 लाख 14 हजार रुपये परत केले. चंद्रशेखर यांनी पाेलिसांचे आभार व्यक्त केले.वाहतूक पाेलिसांच्या कार्यतत्परतेमुळे दुचाकीसह पैसे परत मिळाल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर यांनी दिली.