संगमनेर
Sangamner acid attack तालुक्यातील वडगावपान येथे सहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर झालेल्या भीषण अॅसिड हल्ल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, घटनेला १८ ते २० तास उलटूनही हल्लेखोरांचा ठावठिकाणा लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिस दलाची दहा पथके आरोपींच्या शोधासाठी तैनात करण्यात आली असली तरी तपासाला अद्याप यश आलेले नाही.
या घटनेच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यातील शाळकरी मुली आणि स्थानिक नागरिक आज सकाळी रस्त्यावर उतरले. वडगावपान येथील चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात युवक काँग्रेसच्या जयश्री थोरात तसेच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी सहभाग घेतला. आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, Sangamner acid attack शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी या अल्पवयीन मुलीवर अॅसिड फेकले. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असली तरी आरोपींचा कोणताही ठोस मागमूस लागलेला नाही.दरम्यान, आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी भीती व्यक्त करत सांगितले की, “अशा घटनांमुळे शाळेत जाण्याचीही भीती वाटू लागली आहे. कधी कोण मागून येऊन हल्ला करेल, याचा धाक सतत मनात आहे. सरकारने शाळकरी मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात.”घटनेनंतर सुरुवातीला हल्लेखोर गावातीलच आणि अल्पवयीन असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिस अधीक्षकांनी याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांकडून पीडित मुलीचे नातेवाईक, वर्गमैत्रिणी, शिक्षक यांच्यासह विविध स्तरांवर चौकशी सुरू आहे.
या प्रकरणामुळे पोलिस Sangamner acid attack यंत्रणेसमोर आरोपींचा शोध लावण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तपासासाठी तांत्रिक साधनांचा वापर केला जात असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, जखमी मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.