हॉरर चित्रपटाचा जलवा, जिंकले 14 नामांकन

जगभरात होतेय चर्चा OTT वर पाहू शकता

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
मुंबई,
horror action movie 2026 जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या अकादमी पुरस्कारांमध्ये यंदा एका हॉरर-अॅक्शन चित्रपटाने अभूतपूर्व कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘सिनर्स’ या चित्रपटाने तब्बल १६ विविध श्रेणींमध्ये नामांकन मिळवत नवा इतिहास रचला आहे. यामुळे मोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये हॉरर चित्रपटांना योग्य स्थान मिळत नाही, हा प्रचलित समज खोटा ठरला आहे.
 

Sinners movie, Sinners Oscar nominations, horror action movie 2026, 
यापूर्वी ‘टायटॅनिक’, ‘ला ला लँड’ आणि ‘ऑल अबाउट इव्ह’ या चित्रपटांना प्रत्येकी १४ नामांकन मिळाले होते. मात्र ‘सिनर्स’ने या विक्रमाला मागे टाकत ऑस्करच्या इतिहासात नवे पान लिहिले आहे. ‘बेस्ट पिक्चर’, ‘बेस्ट डायरेक्टर’ आणि ‘बेस्ट अॅक्टर’सारख्या प्रमुख श्रेणींमध्येही या चित्रपटाचे नाव आघाडीवर असल्याने चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे.
‘सिनर्स’ची कथा horror action movie 2026  प्रेक्षकांना १९३२ च्या काळात घेऊन जाते. अमेरिकेतील मिसिसिपी राज्यातील रहस्यमय वातावरणात ही कथा उलगडते. पहिल्या महायुद्धानंतर शिकागोमधून आपल्या गावात परतलेल्या दोन जुळ्या भावांभोवती कथानक फिरते. भूतकाळातील कटू आठवणी मागे टाकून नव्याने आयुष्य सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ते एका जुन्या आरा मशीनच्या जागी ज्यूक जॉइंट सुरू करून आपल्या समुदायासाठी सुरक्षित जागा निर्माण करू पाहतात. मात्र, शांततेच्या शोधात परतलेल्या या भावांना गावातच भयानक अलौकिक शक्तींना सामोरे जावे लागते आणि त्यानंतर सुरू होतो जीव वाचवण्यासाठीचा थरारक संघर्ष.चित्रपटात मायकेल बी. जॉर्डन यांनी दुहेरी भूमिका साकारत प्रभावी अभिनय केला आहे. दोन जुळ्या भावांच्या व्यक्तिरेखा त्यांनी समर्थपणे उभ्या केल्या असून त्यांचा अंतर्गत संघर्ष आणि भीती प्रेक्षकांना खिळवून ठेवते. दिग्दर्शक रायन कूगलर यांनी यापूर्वी ‘ब्लॅक पँथर’सारखा यशस्वी horror action movie 2026  चित्रपट दिल्यानंतर यावेळी हॉरर आणि अॅक्शनचा अनोखा संगम सादर केला आहे. चित्रपटात हेली स्टेनफेल्ड आणि डेलरॉय लिंडो यांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरतात.सुमारे दोन तास १७ मिनिटांचा हा चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टारवर उपलब्ध असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हॉरर आणि थ्रिलर प्रकारातील चित्रपट आवडणाऱ्यांसाठी ‘सिनर्स’ हा एक वेगळा आणि रोमांचक अनुभव ठरत आहे. ऑस्करमध्ये मिळालेल्या या विक्रमी नामांकनांमुळे या चित्रपटाकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.