अनिल कांबळे
नागपूर,
injured in horrific accident एक भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत बहिणीचा मृत्यू झाला तर तिचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला. त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात हिंगणा परिसरात घडली. अनामिका संताेष मडावी (21) असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे तर दीपक शिवकुमार मडावी (17) असे जखमीचे नाव आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनामिका मडावी 12 मार्च 2026 राेजी सायंकाळी सुमारे 4 वाजता तिचा चुलत भाऊ दीपक शिवकुमार मडावी (17) याच्यासाेबत दुचाकीने एम्स रुग्णालयातील श्री साई कॅन्टीन येथे कामासाठी जात हाेती. दरम्यान, हिंगणा पाेलिस ठाण्याच्या हद्दीत कॅन्सर रुग्णालयाजवळील एचपी पेट्राेल पंपासमाेर मागून येणाèया भरधाव टाटा सारी (क्र. एमएच-49 सीडी-8765) कारने निष्काळजीपणे त्यांच्या दुचाकीला जाेरदार धडक दिली. या अपघातात अनामिका हिच्या डाेक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली, तर दीपकच्या शरीराच्या डाव्या बाजूस अंतर्गत दुखापत झाली.injured in horrific accident अपघातानंतर दाेघांनाही तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अनामिकाचा मृत्यू झाला. जखमी दीपक सध्या रुग्णालयात जीवन-मृत्यूशी झुंज देत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हिंगणा पाेलिसांनी आराेपी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.