बंद घराला टार्गेट, १७ लाखांचा ऐवज लंपास

*सीसीटीव्हीत चोरटे कैद

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
तळेगाव (श्या.पं.), 
theft-in-a-closed-house : तळेगाव परिसरातील रामदरा येथे एका बंद घराला टार्गेट करीत धाडसी घरफोडी प्रकरणात चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने अंदाजे १६ ते १७ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चौकशी दरम्यान सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरटे कैद झाल्याची माहिती आहे.
 
 
jkl
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश ठाकरे हे पत्नीसह मोर्शी येथे गेले होते. घराला कुलूप असल्याची खात्री झाल्यानंतर चोरट्यांनी मुख्य दरवाज्याचा कोंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी ६३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि अंदाजे ७ लाख ५० हजार रुपये रोख असा १६ ते १७ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्यामध्ये चोरट्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत. विशेष म्हणजे, चोरट्यांनी या परिसरातील आणखी एका घराला आधी टार्गेट केले होते. त्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरा तोडून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या घरात हालचाल दिसल्याने त्यांनी माघार घेतली. यानंतर त्यांनी ठाकरे यांच्या बंद घरावर लक्ष केंद्रित करून चोरी केली.
 
 
घटनेनंतर पोलिसांनी डॉग स्वॉडला पाचारण केले होते. डॉग स्वॉडने काही अंतरापर्यंत माग काढत आधी टार्गेट केलेल्या घरापर्यंत धाव घेतली, मात्र त्यानंतर त्यांचा माग हरवला आणि ते पुन्हा घटनास्थळी परतले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून या चोरीचा छडा केव्हा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.