नागपूर ,
Baljagat Lakshmi Nagar दीनदयाल शोध संस्थान, बालजगत, लक्ष्मी नगर येथे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला गुढी उभारून नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रतिमा माटेगावकर उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी बालकांना गुढीपाडव्याचे महत्त्व तसेच हा सण का साजरा करतो याबद्दल मार्गदर्शन केले आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमात मुलांनी श्लोक सादर केले. तसेच सर्वांनी मिळून सादर केलेल्या ‘एक श्लोकी रामायण’ने कार्यक्रमाची सांगता झाली
.कार्यक्रमाचे संचलन प्रियांका कुंटे यांनी केले. या प्रसंगी बालजगत प्रकल्प प्रमुख अनुजा परचुरे, उपनिदेशिका माधवी जोशीराव सहसचिव नीता केकरे, अंजली साठे तसेच बालजगतचे कार्यकर्ते व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:निकिता लुटे,संपर्क मित्र