व्यापाऱ्याची 17.50 लाखांची फसवणूक; दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :19-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
businessman cheated इतवारी परिसरातील एका व्यापाऱ्याला ऑटाे एलपीजी गॅस व्यवसायाची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून 17 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तहसील पाेलिसांनी दाेन आराेपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.
 
 
businessman cheated
 
पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुदाम गल्ली, काेचेश्वर शिव मंदिर परिसर, इतवारी येथील रहिवासी जगदीश रामदास घटे हे आपल्या नातेवाईक ममता नीलकंठ घटे यांच्यासह ‘मेसर्स सिद्धी इंटरप्रायझेस’ ही फर्म चालवतात. वर्ष 2020 मध्ये एका वृत्तपत्रातील फार्च्यून पेट्राेलियम अँड ऑटाे एलपीजी प्रा. लि. कंपनीची जाहिरात पाहून त्यांनी दिलेल्या क्रमांकावर राजेश भास्कर नायर याच्याशी संपर्क साधला. 20 फेब्रुवारी 2020 राेजी आराेपी राजेश नायर हा त्याचा साथीदार सचिन दुधे याच्यासह घटे यांच्या घरी आला. त्यांनी सी अँड एफ एजन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखवत 12 लाख 50 हजार रुपये सुरक्षा ठेव म्हणून घेतले. त्यानुसार घटे यांनी ही रक्कम आराेपीच्या कंपनीच्या खात्यात वर्ग केली. यानंतर दाेघांमध्ये करारही करण्यात आला व 4 मार्चपासून व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्यानंतरही व्यवसाय सुरू झाला नाही.businessman cheated दरम्यान, लाेखंडाच्या दरवाढीचे कारण सांगत एप्रिल 2024 मध्ये आराेपींनी आणखी 5 लाख रुपये उकळले आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवले. तरीही सहा वर्ष उलटूनही एजन्सी सुरू झाली नाही.
 
वारंवार विचारणा करूनही आराेपी टाळाटाळ करत राहिले. पैसे परत मागितल्यावर त्यांनी बनावट बँक स्टेटमेंट व खाेटे व्यवहार दाखवणारी कागदपत्रे देऊन फिर्यादीची दिशाभूल केली. अखेर फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर घटे यांनी पाेलीसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून 17 मार्च 2026 राेजी दाेन्ही आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदवण्यात आला असून पुढील तपास पाेलिस करत आहेत.