अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

    दिनांक :19-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर 
molesting minor girl खापरखेडा हद्दीत राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी राकेश राजू हजारे (26) यास अटक केली. राकेश हा पीडित मुलीच्या ओळखीचा हाेता. मागील काही दिवसांपासून ताे मुलीचा पाठलाग करून तिला तिचा माेबाईल क्रमांक मागत हाेता.
 

molesting minor girl 
 
त्याचप्रमाणे ताे अश्लिल इशारे करीत हाेता. 16 मार्च राेजी सकाळी 10 च्या सुमारास पीडित मुलगी ही घरी हजर असताना राकेशने लज्जास्पद कृत्य केले.molesting minor girl त्याचप्रमाणे माेबाईल क्रमांक न दिल्याने त्याने शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून खापरखेडा पाेलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नाेंदवून आराेपी राकेश यास अटक केली.