पाडवा पहाटमध्ये आनंदीचा आवाज, चैतन्याची लय!

    दिनांक :19-Mar-2026
Total Views |
उमेश ताकसांडे
वर्धा,
Pandharpur Padwa celebration दर्जेदार गाण्यांची निवड, त्याच तोडीचा आवाज आणि साऊंड सिस्टमसह नजर पुरेल अशा उपस्थितीत आनंदीचा आवाज, चैतन्याची लयमध्ये वर्धेत पाडव्याची पहाट झाली... प्रत्येक गाण्यावर तल्लीनता आणि त्याला भंग करणार्‍या टाळ्यांचा कडकडाट एवढेच काय तीन तास गायकांनी वर्धेकरांना अनुभवले!
 
 

Pandharpur Padwa celebration 
श्रीराम मंदिर व श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने सोशालिस्ट चौकात मराठी नववर्षारंभानिमित्त पाडवा पहाट पुण्याचा चैतन्य कुलकर्णी आणि मुंबईची आनंदी जोशी या युवा गायकांनी शेवटपर्यंत रसिकांना खिळवून ठेवले. सुरूवातीलाच मोरया... मोरया... गणपती बाप्पा मोरया... या गणेश वंदनेने रसिकांमध्ये उत्साह भरला. श्रीराम... श्रीराम... श्रीरामचंद्र कृपा रहे... हे संस्कृत भजन, पायोजी मैने राम रतन धन पायो हे मीराबाईंचं भजन आणि ज्ञानदेवांची आठवण करून देणरा लता मंगेशकर यांच्या आवाजातील मोगरा फुलला हा अभंग आनंदीने फुलवला तर काळ देहाशी आला काहो, नाथाघरी नाचे माझा पांडुरंग... ही दोन अभंग चैतन्य कुलकर्णी यांनी सादर करून रसिकांची भरभरून दाद मिळवली.
सुर्योदयाच्या पहिल्या किरणाला शंखनाद आणि फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी माजी खासदार दत्ता मेघे, खासदार अमर काळे, जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, संत सयाजी महाराज, गायक आनंदी जोशी, चैतन्य कुलकर्णी, आदींच्या स्वागतानंतर दुसर्‍या सत्राला तेवढ्याच .... चैतन्य कुलकर्णी यांच्या साथीने आनंदी जोशी यांनी खेळ मांडीला हा संत तुकारामांचा अभंग आणि हरी हरी जागा झाला सीतावन... हा ज्ञानोबाचा अभंग गायला. तर फिरत्या चाकारवती देशी मातीला आकार... माती-पाणी उजेडा वारा तूच दिसेशी, झाला महार पंढरीनाथ, देव देव्हार्‍यात नाही, राजा पंढरीचा, ही अभंगांची माळ चैतन्य कुलकर्णी यांनी ओवली. कानडा राजा पंढरीचा... आणि विठ्ठलाचे नामस्मरण, पं. अजित कडकडे, नंदू होनप यांची संगीतबद्ध स्वामी समर्थांची रचना चैतन्य कुलकर्णी यांनी सादर करून समा बांधला. त्याचबरोबर गोकुळातील बाललीला, मथुरा भतीचा प्रकार असलेली अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी... ही गवळण आनंदी जोशी यांनी सादर करून कार्यक्रमात उत्साह भरला.
मोहम्मद रफी यांच्या मधुबन मे राधिका नाचे रे, गिरीधर की मुरलीया बाजे रे... हे हिंदी फिल्मी गीत आणि शांता शेळके यांचे लता आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, रामाचे भतीगीत चैतन्य कुलकर्णी यांनी सादर केले. दमा दम मस्त कलंदर या जोशपूर्ण गाण्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जयोस्तू ते या अजरामर गीताने शेवट झाला. निवेदिका म्हणून आसावरी देशपांडे यांनी मंच सांभाळला. आभार राजेंद्र उमाटे यांनी मानले.
कार्यक्रमाला नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख, माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ. अभ्युदय मेघे, प्रदीप बजाज, वैभव काशिकर, सचिन अग्निहोत्री, संजीव लाभे, अरुण काशिकर, विजय धाबे, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.