भारत-पाकिस्तान तणावावर गंभीर इशारा!

अणुसंघर्षाचा धोका कायम

    दिनांक :19-Mar-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
warning on India-Pakistan tensions मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगातील सुरक्षाविषयक चिंतेत भर पडली असून भारत-पाकिस्तान संबंधांबाबतही गंभीर इशारा देण्यात आला आहे. अमेरिकी गुप्तचर समुदाय यांनी सादर केलेल्या वार्षिक धोका मूल्यांकन अहवालात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे अणुसंघर्षाचा धोका अद्याप कायम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, दोन्ही देशांना थेट युद्ध नको असले तरी दहशतवादी कारवायांमुळे परिस्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः जम्मू-काश्मीरमधील पूर्वीच्या हल्ल्यांसारख्या घटना तणाव वाढवू शकतात, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे काही प्रमाणात तणाव कमी झाला असला तरी परिस्थिती पूर्णपणे स्थिर झालेली नाही, असेही अहवालात म्हटले आहे.
 
 
India-Pakistan tensions
 
दरम्यान, तुलसी गबार्ड यांनी अमेरिकन संसदेसमोर माहिती देताना पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र क्षमतेबाबत चिंता व्यक्त केली. भविष्यात अशा क्षेपणास्त्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, ज्यामुळे जागतिक सुरक्षेसमोर नवे आव्हान उभे राहू शकते, असे त्यांनी सांगितले. या अहवालात रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराण आणि पाकिस्तान यांसारखे देश आधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढण्याची शक्यता असून जगभरातील सुरक्षाव्यवस्थांसमोर नवे धोके निर्माण होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.