डॉ. देवराव होळी यांचा चामोर्शीत सत्कार

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
चामोर्शी, 
माजी आमदार तथा भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष Dr. Devrao Holi डॉ. देवराव होळी यांच्या प्रथम गडचिरोली आगमनानिमित्त चामोर्शी येथे जल्लोषात व उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. चामोर्शी येथील लक्ष्मी गेट चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी आमदार तथा नवनियुक्त भाजपा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचे स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीसह ढोल ताशाच्या गजरात आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी डॉ. होळी यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.
 
 
holi sx
 
Dr. Devrao Holi  याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, ज्येष्ठ भाजपा नेते तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, भाजपा तालुका अध्यक्षा रोशनी वरघंटे, कृउबा संचालक हेमंत बोरकुटे, पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव इचोडकर, माजी उपसभापती विलास दशमुखे, चंद्रकांत दोषी, सचिन येनप्रेड्डीवार, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, जनार्धन चलाख, प्रतीक राठी, माजी नगरसेवक प्रशांत एगलोपावर, सुजित मुजुमदार, रेवनाथ कुसराम, प्रदीप मंडल, शंकर दास, प्रफुल बिजवे, जयराम चलाख, पुरुषोत्तम बोरकुटे, विष्णू ढाली, दीपक वासेकर, विजय नल्लावर, निखिल धोडरे, भोजराज भगत, विलास चरडुके, भाविक आभारे, आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा महासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सूरज मडावी, गडचिरोली शहर अध्यक्ष नीलेश आत्राम, शहर उपाध्यक्ष श्याम सलामे, सचिन भोयर, आदिवासी विकास परिषदेच्या तालुका अध्यक्ष सुषमा गेडाम, यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. देवराव होळी यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.