हिंदू समाजाचे संघटन काळाची गरज : राजेश्वरानंदचार्य

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
* आर्वीत विशाल हिंदू संमेलन
 
आर्वी, 
Arvi Hindu Sammelan आपली भारतीय सभ्यता आणि सनातन संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ असुन आर्वी शहर अध्यात्माचे माहेरघर आहेत. आर्वी शहरात अनेक नामवंत संत होऊन गेले असून त्यांनी आपल्याला मोलाचे धार्मिक, नैतिक, सामाजिक, अध्यात्मिक मार्गदर्शन केले. आपल्याला आपली प्राचीन सनातन हिंदू संस्कृती, धर्म टिकवण्यासाठी प्रत्येक जागृत हिंदूने आपल्या परपंरेबद्दल सकारात्मक द़ृष्टिकोन स्विकारायला पाहिजे, असे मार्गदर्शन कौंडण्यपूर येथील जगतगुरू रामानंदाचार्य राजेश्वरानंदचार्य यांनी केले. सकल हिंदू समाजाच्या वतीने गुरुनानक कार्यालयाच्या प्रागंणात आयोजित विशाल हिंदू संमलेनात ते बोलत होते. व्यासपीठावर हिंदू धर्माच्या अभ्यासक डॉ. सीमा पंढरकर होत्या.
 
 
arvi dksl
जगतगुरू राजेश्वरानंदचार्य पुढे म्हणाले की, जगातील अनेक परकीय शतींनी विध्वंसक, विनाशकारी आक्रमक हल्ले करून हिंदू संस्कृती नष्ट करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. परंतु, सनातन हिंदू धर्माच्या भारतीयांनी हे हल्ले परतवून लावून हिंदू संस्कृती नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे भारतीय धर्म, संस्कृती, मूल्ये टिकवण्यासाठी साप्रंत काळात युवकांनी देशाच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. सीमा पंढरकर यांनी हिंदू धर्माचे महत्त्व विषद करतांना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक थोर महापुरुष, नामवंत संत जन्माला आले असून त्यांनी भारतीयांच्या मनात ज्वाज्वल मूल्ये, देशभिमान, स्वधर्माबद्दल आदरभाव शिकविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे आपली पुरातन असलेली हिंदू संस्कृती काळाच्या प्रवाहात टिकून आहेत. त्यासाठी समाजाप्रती आपले नैतिक कर्तव्य आणि सामाजिक उत्तरदायित्व जोपासुन आपण हिंदूच्या एकत्रिकरणासाठी पुढाकार घेऊन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक समरसता जोपासल्यास, हिंदू संस्कृती व सनातन धर्माला बळकटी मिळेल, असे त्या म्हणाल्या. महिलांनीही आधुनिकीकरणाच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचा पुरस्कार करणे टाळले पाहिजे, त्यासाठी आपल्या वैयतिक व सामाजिक जीवनात स्नेहभाव, परोपकार, नैतिकता, साधनसुचिता जपली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. आपल्या देशात हिंदू हा समाज सहिष्णू असुन तो दुसर्‍या धर्माचा आदरभाव करतो. परंतु, आपल्या देशात तथाकथित धर्मनिरपेक्षता जपणारी हिंदू द्रोही शक्ती हिंदूंचे खच्चीकरण करण्याचा कुटील डाव खेळत आहेत, हा डाव भगव्याला नमन करणार्‍या हिंदूनी उधळून लावून, त्यांचे मनसुबे उधळून लावून संपूर्ण हिंदू समाजाला संघटीत केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक मिथिलेश बिजवे यांनी केले. संचालन नगरसेवक संपदा जोशी यांनी तर आभार महेंद्र गोमासे यांनी मानले. कार्यक्रमाला आ. सुमित वानखेडे, नगराध्यक्ष स्वाती गुल्हाणे, उपाध्यक्ष गौरव जाजू, आदींसह शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
Arvi Hindu Sammelan यशस्वीतेकरिता वर्धा नागरी बँकेचे अध्यक्ष डॉ. विनय देशपांडे, मदत फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी, श्रीकांत पेंडके, अभय हळवे, व्हि. टी. देशपांडे, रमेश नागोसे, सुरेंद्र पारसे, सुनील पारसे, विक्की गुल्हाणे, मुकुंद देशपांडे, रमेश ठाकरे, राजू मांजरे, प्रकाश गुल्हाणे, पंकज दस्तुरे, महेंद्र गोमासे, रवींद्र गोडबोले आदींनी सहकार्य केले.