राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : पती राजू गोरे यांची विनंती

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
पुणे
Ashwini Bidre murder case सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरले होते. ११ एप्रिल २०१६ रोजी त्या अचानक बेपत्ता झाल्या होत्या, आणि पुढे तपासात त्यांच्या अनैतिक संबंधातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि त्याच्या साथीदारांनी हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणात तब्बल ८ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर मे २०२५ मध्ये अलिबाग न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
 

Ashwini Bidre murder case, Assistant Police Inspector Ashwini Bidre, Abhay Kurundkar criminal case,
तरीही पोलीसांच्या नोंदींमध्ये अश्विनी बिद्रे बेपत्ता असल्याची नोंद कायम आहे. यावरून त्यांच्या पती राजू गोरे आणि मुलीने थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. राजू गोरे म्हणाले, “अशा गंभीर प्रकरणात शासन दुर्लक्ष करत आहे. आमच्या मुलीला आणि मला इच्छा मरण मिळावी अशी विनंती आम्ही करतो. आम्ही संबंधित प्राधिकरणांकडे अर्ज दाखल केला, परंतु आवश्यक कारवाई होत नाही. ही यंत्रणा केवळ आरोपींसाठी काम करते, आम्ही न्याय मिळवू शकत नाही, म्हणून आम्ही राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायाधीशांकडे हे प्रकरण सादर करत आहोत.”
अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात तपासादरम्यान पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरने कबुली दिली होती की, ११ एप्रिल २०१६ रोजी त्यांनी आणि त्याच्या साथीदारांनी अश्विनी बिद्रे यांची हत्या केली होती. मृतदेह तुकडे करून लोखंडी पेटीत भरला आणि वसईच्या खाडीत फेकण्यात आला, परंतु ते आजही सापडलेले नाहीत.ही घटना महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. आठ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतरही अश्विनी बिद्रेच्या कुटुंबाला न्यायाची पूर्ण खात्री नसल्याने त्यांनी राष्ट्रपतींकडे थेट मदतीसाठी अर्ज केला आहे.