होळीच्या पूर्वसंध्येला बामर्डा घाटावर वाळूचा बळी!

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
*वर्धेतील तिघांना अटक, ठाकूर सह आठ फरार
वर्धा, 
शासकीय लिलावात मिळवलेला Bhadravati case वाळू घाट भद्रावती येथील गितेश सातपुते (ह. मु. नागपूर) याने २.५ कोटींमध्ये विकला. मात्र, मुदतीपूर्वीच गितेश सातपुते याने शिल्लक रकम २८ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे ठरवून विकलेला वाळूघाट परत मागितला. सातपुते हा पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने वर्धा जिल्ह्यातील १३ भागीदारांनी थेट वाळूघाट गाठला. या भागीदारांची वाट अडवून तलवारी, लाकडी दांड्यांनी जबर मारहाण केली. यात भरत नागपाल रा. पुलगाव याचा मृत्यू तर अन्य जखमी झाले. ही घटना वरोरा तालुयातील बामर्डा वाळू घाटावर १ रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास झाली. घटनेची तक्रार वरोरा पोलिसात देण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत ३ जणांना अटक करण्यात आली असून ८ जण फरार आहेत.
 
 
bhadrka
 
वरोरा तालुयातील बामर्डा येथील वणा नदीचा वाळूघाट सन २०२५ मध्ये गितेश सातपुते याने शासकीय लिलावात मिळवला होता. मात्र, तो वाळूघाट त्याने पंकज वानखेडे रा. काजी वार्ड हिंगणघाट, अमोल ठोंबरे रा. निशानपुरा वार्ड हिंगणघाट, प्रवीण घुरडे रा. हिंगणघाट, अमोल ठोंबरे रा. हिंगणघाट, अमित साहू रा. हिंगणघाट, दिनेश नागपाल रा. पुलगाव, भरत नागपाल, कैलास धारवाल रा. वर्धा, भूषण वाघमारे रा. सेलू, मयूर गौळकार, योगेश रामटेके, राजू गोवारदिपे, हर्षल बोधाणे रा. वरोरा या सर्वांनी मिळून भागिदारीत २.५ कोटीमध्ये यांना विकला. ही रकमही गितेश सातपुते याच्या खात्यात जमा करण्यात आली. या घाटाचा कालावधी ९ जून २०२६ पर्यंत असताना गितेश सातपुते याने २५ जानेवारी रोजी हा घाट परत मागून त्याची शिल्लक रकम ९८ लाख ६४ हजार ६२१ रुपये २८ फेब्रुवारीपर्यंत परत करण्याचे आश्वासन दिले.
 
 
१ मार्चला कैलास धारवाल यांनी गितेश सातपुते याला फोन करून शिल्लक रकमेची मागणी केली.Bhadravati case  त्यावेळी सातपुते याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ही बाब धारवाल यांनी पंकज वानखेडे यांना सांगितली. पंकज वानखेडे यांनी सुद्धा सातपुते यांना फोन करून पैसे परत मागीतले. मात्र, पुन्हा तीच उत्तरे मिळाल्याने पंकज वानखेडे, भारत नागपाल, कैलास धारवाल, भूषण वाघमारे, अमोल ठोंबरे, अमित साहू, विराज शिंदे, मयूर गौरकाळ, योगेश रामटेके, राजू गोवारदिपे, गणेश खडसे या सर्व भागीदारांनी चार वाहने घेऊन सायंकाळी ६ वाजता सातपुते यांना भेटण्याकरिता बामर्डा वाळू घाट गाठला. त्यावेळी घाटावर वाळू उपसा सुरू होता. दरम्यान, मयूर गौळकार यांच्या मोबाईलवर गितेशचा फोन आला. ‘तू पण घाटात आहे का, बघतो मी तुम्हाला’, असे बोलून फोन कापला. त्यानंतर लगेच गितेश सातपुते याच्या सांगण्यावरून पोकलॅण्ड ऑपरेटरच्या सहाय्याने व घाटातील दिवाणजी यांनी घाटातून बाहेर जाण्याच्या दोन्ही रस्त्यावर दोन पोकलॅण्ड मशीन आडवी केली. थोड्याच वेळाने एम. एच. ३२ ए. एस. ५७५७ क्रमांकाच्या गाडीने अमोल कामडी, अक्षय खडसे व इतर तीन जण आले. त्यांच्या हातात तलवार आणि लाकडी दांडे होते.
 
 
त्यांच्याच मागून सौरभ ठाकूर हा तलवार तर सुनील झोरे, प्रफुल्ल उमाटे, अतुल मोटघरे हे लाकडी दांडे घेऊन आले. सौरभ ठाकूरने पंकज वानखेडेवर वार केला तो थेट डोयाच्या खाली लागला. त्याचवेळी भरत नागपाल याने पंकजला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सौरभने भरतवर वार करून गंभीर जखमी केले. भरत रताच्या थारोळ्यात खाली पडला. अमोल कामडी व इतर तीन ते चार लोकांनीही जबर मारहाण करणे सुरू केली. जीवाच्या आकांताने सर्व भागिदारांनी आरडाओरड करीत पळ काढला. शेतात उभे राहून बघत असताना सौरभ ठाकूर, अमोल कामडी, अक्षय खडसे व त्यांच्या साथीदारांनी भरतला मारहाण करीत गंभीर जखमी अवस्थेतच नदीत फेकून दिले. पात्र खोल असल्याने भरत नागपाल पाण्यात बुडू लागला. त्यानंतर हल्लेखोरांनी वाहनांची तोडफोड करून डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात पोलिस येत असल्याचे लक्षात येताच सर्व जण पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून भरत नागपाल याला नदीतून बाहेर काढून हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉटरांनी त्याला मृत घोषित केले.
 
 
Bhadravati case या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसही अ‍ॅशन मोडवर आले. आरोपी वर्धेकडे येत असल्याची माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी दारोडा टोल नायावर सुनील झोरे रा. सावंगी मेघे, प्रफुल्ल उमाटे रा. गांधीनगर आणि अतुल मोटघरे रा. त्रिमूर्तीनगर वर्धा यांना अटक करून त्यांना वरोरा पोलिसांच्या स्वाधीन केले. फरार आरोपींचा वरोरा पोलिस शोध घेत आहे. मृतक भरत नागपाल याचा मृत्यूविषयी दु:ख व्यत करण्यात येत आहे. पुलगाव येथे त्याच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. त्याची पत्नी ७ महिन्यांची गरोदर आहे. आई आजारी असुन दोन वर्षांच्या मुलगा आहे.