डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना शिलाँगचा प्रतिष्ठित पुरस्कार

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
नागपूर, 
Dr. Ved Prakash Mishra डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना मेघालयातील शिलाँग येथील नॉर्थ इस्टर्न इंदिरा गांधी मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ अँड मेडिकल सायन्सेसचा पुरस्कार जाहीर झाला आहे. गुरुवारी ५ मार्चला शिलाँग येथील संस्थेच्या सभागृहात होणार्‍या पदवीदान समारंभात त्यांना हा प्रदान केला जाईल. याचवेळी ‘भारतीय वैद्यकीय शिक्षणाचे जागतिकीकरण - पुढे जाण्याचा मार्ग’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब मंत्रालयाच्या तत्वाखालील प्रतिष्ठित राष्ट्रीय आरोग्य विज्ञान संस्थांच्या प्रचलित पद्धतीच्या संदर्भात दीक्षांत भाषणही ते देतील.
 
 
misra
 
Dr. Ved Prakash Mishra  वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात उच्चतम मानाचा डॉ. बी.सी. रॉय राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ. मिश्रा सध्या डीएमएचईआरआयचे (अभिमत विद्यापीठ) प्र-कुलपती व मुख्य सल्लागार आहेत. याशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते पदाधिकारी आहेत. हा पुरस्कार त्यांनी त्यांच्या आई व आजीवन प्रेरणास्रोत दिवंगत शिवकुमारी मिश्रा यांच्या स्मृतीला अर्पण केला आहे.