*सामाजिक वनीकरण विभाग व एडेड हायस्कूलचे आवाहन
बुलढाणा,
eco-friendly Natural Holi धुलीवंदन सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभाग, बुलढाणा व एडेड हायस्कूल बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.यावेळी नागरिकांनी रासायनिक रंगांचा वापर टाळून फुलांपासून, औषधी वनस्पतींपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरावेत, असे मार्गदर्शन करण्यात आले. नैसर्गिक रंगांमुळे त्वचा, डोळे आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळता येतात, तसेच जलप्रदूषणही कमी होते असेही सांगण्यात आले.
eco-friendly Natural Holi याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाचे विपुल राठोड, तोंडीलायता, गीते तसेच एडेड हायस्कूलचे मुख्याध्यापक धनंजय किंबहुने, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख राजेंद्र तोमर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत जनजागृती मोहिमेत हातभार लावला.शहरातील बसस्थानक परिसरात नैसर्गिक रंगाचे दालन लावण्यात आले होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सर्व नागरिकांनी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक धुलीवंदन साजरे करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.