होली हैऽऽऽ

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
महाराज! तुम्हाले फवार्‍याचं भेव वाटते का?
प्रफुल्ल व्यास
वर्धा, 
वर्धा शयर तसं चौफेर पसरून रायलं भो... विकास भी भल्ला दवडून रायला! कांग्रेसच्या कायात कनी 'Gandhi for Tomorrow' ‘गांधी फॉर टुमॉरो’ची लय चर्चा होती. पन कनी कुदय काय मारल्या गेली नाय! थे काम कनी भाजपाच्या सरकारात झालं. शयरच नाय त अजूबजूचे गावंही त्यामंधी घेतले. थ्या गावाले काय भेटल न काय पुर झालं थे नाय सांगता येत. पण, शयरात जे हुतं थे भी बंद होते कनी तव्हा वज्जरच लाजीरवानं वाटतं भो साहेब...
 
 
hokldsldk
 
तुमी म्हन्ता तसं नाय! या शयराचं नाव देशविदेशात पोयचलं हाय! वर्धा म्हनताच लोकं कनी सेवाग्राम अन पवनार इचारते! वर्धा सांगायचं झालं त कनी ओ नागपूर के पास असं पटवून शिन्यान द्या लागते नाय त मग हायच बापुच्या सेवाग्राम जवयचं वर्धा! इदर्भातल्या बाकीच्या जिल्ह्यांच्या मानानं ह्या जिल्हा उलिकसा हाय अन् शयर त इचारूच नका... अजून बी बॅचलर रोड अन शिवाजी ते बजाज चौक एवढेच रस्ते डोया पुढं येतं. बरं झालं शिवाजी चौकाची आठवन आली तर सांगून देतो... पहिले ह्या चौक कनी शिवाजी चौक म्हून ओयखल्या जात हुता. मंग कनी शिवाजी महाराज चौक अशी ओयख झाली. शयरात कनी मोजून अर्धा डझनच चौक हायत. धुनिवाले, आरती, आर्वी, शिवाजी, बजाज, शास्त्री, लक्ष्मी बाई न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रसिद्ध हाय अन सोशालिस्ट चौकाले एैतिहासिक परंपरा हाय. यथं मोठमोठ्या नेत्यायच्या सभा झाल्या. ह्या चौकायमंधी कनी शिवाजी महाराज चौक अन बजाज चौक नशिबवान रायला. दोन बी चौकात कमी सेवाग्राम विकास आराखड्यातून इकास झाला भाऊ! इकास काय झाला म्हनता त फव्वारे लावले. इथच खरी ग्यानबाची गोम रायली. शिवाजी महाराज चौकात फवारे त लागले.
 
 
 
'Gandhi for Tomorrow' पन कनी त्या फवार्‍यासाठी पान्याची काय यवस्था नाय केली. मंग अमावस्या पौर्णिमेले कनी ट्रॅन्करनं पानी टाकाची यवस्था नगर पालिकेच्या सुपीक डोयातून निंघाली. डोयात आलं का पानी टाकायचं न मंग फवारं उडे अन् वर्धेतले लोकं सेल्फी काढाले उभे राये! मले वाटते का नगर पालिकेले कनी महाराजा जवय सेल्फी काढणार्‍याचा वज्जर राग येत असन म्हून कनी तैनं फव्वारेच देल्ले लावनं बंद करून! आता त शिव जयंती झाली. पुतया भोवताल लायटींग लागली, पोवाडे झाले. दिसभर लोकायनं हार काय टाकले. पन कनी नगर पालिकेने फव्वारे सुरू कयाचा चेवच नाय आला. तसं बी टॅन्करनं पानी टाकलं त फव्वारे लागते नाय त पुतया कोड्डा ठनान रायते. थ्या मुयं महाराज तुम्हाले वर्धेच्या फव्वार्‍याचं भेव वाटतं काय इसं इचारा लागलं... आता कनी बजाज चौकात ५० लाखाचा युथ वाला एक पंजा उभा हाय अन् फव्वार्‍याच्या भींतीले रंग मारनं सुरू हाय! पण, बजाज चौकाचं अजून कनी सौंदर्यीकरन होनार हाय असं अजच पोलिस सायबानं सांग्ल! आपल्याले काय डोयानं दिसते थे थे पायचं तेवढं काय हाय असं जनता म्हन्ते! होई ले पानी फेकून झालं का शिवाजी चौकातले तेवढे फव्वार्‍याचं तेवढं नगर पालिकेनं पायलं पायजे. शिवाजी महाराजाचं नाव घेतल्यावर इरोधक थरथर कापे त महाराज काय वर्धेतल्या पान्याच्या फव्वाल्याने भीन का? सांगा बा तुमीच! लागले पायजे का नाय फवारे न शहरचं अजून सौंदर्यीकरन झालं पायजे. पण, झाडं शाबून ठेवत... नाय त आमच्या मुरलीधर भाऊले या लावन अजून झाडं लावाले...