देवळीत संघ शताब्दी वर्षानिमित्त हिंदू संमेलन

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
पंच परिवर्तनवर रामजी लोखंडे यांचे प्रभावी मार्गदर्शन
देवळी, 
Hindu Sammelan  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सकल हिंदू समाज देवळीच्या वतीने विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अमरानंद भारती मुंगसाजी महाराज देवस्थान कोल्हापूर, ज्येष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल, संत विजय महाराज राजराजेश्वर संस्थान पोटी, रवींद्र महाराज विलायतकर, अंकीचंद दास प्रभू इस्कॉन, अंबिका देवी भारती अंबिका देवी संस्थान बोपापूर, तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या ममता दीदी, मोहन जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख वते म्हणून यवतमाळ येथील विश्व हिंदू परिषदचे विदर्भ प्रांत सेवाप्रमुख राम लोखंडे यांची उपस्थिती होती.
 
 
hindi
 
यावेळी लोखंडे यांनी सामाजिक समरसता, स्वबोध, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, स्वआधारित जीवनशैली आणि नागरी कर्तव्य या विषयांवर मार्गदर्शन केले. समाजातील सर्व घटकांनी एकात्मतेने कार्य करून राष्ट्रनिर्मितीत सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी केले तर मान्यवरांनी हिंदू समाजातील ऐय आणि संस्कारांचे जतन यावर आपले प्रभावी विचार व्यक्त केले. प्रथम सकाळी वैदिक मंत्रोच्चार व महाहोम यज्ञाने समेलनाची सुरुवात झाली. २१ विविध समाजांतील जोडप्यांनी हिंदवः सोदरा सर्वे या भावनेतून एकात्मतेचा संदेश देत सहभाग नोंदविला. तसेच विविध गावांतील भजनी मंडळांच्या सहभागासह देवळी शहरातून दिंडी व रॅली काढण्यात आली. ढोल-ताशांच्या निनादात निघालेल्या दिंडीचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले.
 
 
Hindu Sammelan संचालन सागर कपूर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर काळे यांनी केले. यशस्वीतेसाठी महेश जोशी, महेश खोलाडे, शिरीष ठाकरे, प्रशांत पट्टे, सचिन वैद्य, हेमंत जावंधिया, आकाश गवते, आदींनी परिश्रम घेतले.