हटिया-एलटीटी-हटिया नागपूरमार्गे होळी विशेष गाडी

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Holi special train होळी सणात प्रवाशांनी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूरमार्गे हटिया-एलटीटी (लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई)-हटिया होळी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाड़ी क्रमांक ०८०६०९ हटिया-एलटीटी होळी विशेष गाडी मार्चला चालविण्यात येणार आहे. ही गाडी सायंकाळी ४.२० वातजा हटिया स्थानकावरून प्रस्थान करेल. तिसर्‍या दिवशी रात्री १२.४० वाजता एलटीटी स्थानकावर पोहोचेल.
 
 
hosdksldk
 
गाडी क्रमांक ०८६१० एलटीटी-हटिया होळी विशेष गाडी ४ व ११ मार्चला चालविण्यात येणार आहे. ही गाडी एलटीटी स्थानकावर पहाटे ५ वाजता प्रस्थान करणार असून दुसर्‍या दिवशी सायंकाळी ६ हटिया स्थानकावर दाखल होईल. दोन्ही गाड्यांना राऊरकेला, झारसुगुडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण व ठाणे स्थानकांवर थांबा राहणार आहे. प्रवाशांनी विशेष गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. |