युद्धाच्या पार्श्वभूमीवर हिंसाचाराची भीती; भारता कडून राज्यांना सतर्कतेचा इशारा

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,  
home-ministry-letter-to-states मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला असून अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर सातत्याने हल्ल्यांची मालिका सुरू ठेवली आहे. तेहरानसह अनेक महत्त्वाच्या शहरांवर जोरदार बॉम्बवर्षाव करण्यात येत असून राजधानी तेहरानमध्ये सर्वाधिक हानी झाल्याचे वृत्त आहे. या भीषण कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर इराणमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायलसह नऊ देशांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र आणि मानवरहित विमानांच्या साहाय्याने हल्ले चढवले आहेत.

home-ministry-letter-to-states 
 
खामेनेई यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ इराणमध्ये तसेच इतर काही देशांत मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भारतातही तणाव निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करत भारताचे गृह मंत्रालय यांनी सर्व राज्य सरकारांना इशारा देणारे पत्र पाठवले आहे. २८ फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या या पत्रात संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः इराण समर्थक तीव्र भूमिका मांडणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. home-ministry-letter-to-states मध्यपूर्वेतील संघर्षानंतर देशातील काही भागांत निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, अमेरिकेने या कारवाईत खामेनेई यांच्यासह चाळीसहून अधिक इराणी नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. home-ministry-letter-to-states डोनाल्ड ट्रम्प यांनी एका संदेशाद्वारे इराणविरुद्धची मोहीम उद्दिष्ट साध्य होईपर्यंत सुरूच राहील, असा इशारा दिला आहे. दुसरीकडे, इराणनेही मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून इस्रायल, कुवेत, संयुक्त अरब अमिरात, कतार आणि बहरीन या देशांकडे क्षेपणास्त्रे व मानवरहित विमानांच्या साहाय्याने हल्ले केल्याचे सांगितले जात आहे. या संघर्षात अमेरिकेच्या तीन सैनिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. मध्यपूर्वेतील हा संघर्ष अधिक तीव्र होत असून त्याचे पडसाद जागतिक पातळीवर उमटत आहेत.