डिजिटल अरेस्टच्या धमकीतून ११ कोटींची फसवणूक

सायबर पोलिसांकडे मोठे यश

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
पुणे
Pune cyber fraud शहरात सायबर गुन्ह्यांच्या क्षेत्रातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगून दोन तरुणांनी एका ज्येष्ठ नागरिकाला “डिजिटल अरेस्ट करण्यात येणार” अशी भीती दाखवून तब्बल १० कोटी ७४ लाख रुपयांची फसवणूक केली. पुणे सायबर पोलिसांनी हर्षद सुभाष धंतोले (२३) आणि समर्थ देशमुख (२४) यांना अटक केली असून, हा पोलिसांसाठी मोठा यशस्वी ठरला आहे.
 

Pune cyber fraud, senior citizen scam, 
माहितीनुसार, दोघांनी ज्येष्ठ नागरिकांना थेट बँक खात्यात तातडीने रक्कम जमा करण्यास सांगितले. भीतीमुळे पीडितांनी त्यांची मागणी मान्य केली आणि रक्कम दोघांच्या अकाउंटमध्ये जमा केली. काही दिवसांनी फसवणूक समजताच त्यांनी शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.पोलिसांनी तपासात लक्षात घेतले की, आरोपींनी रक्कम एटीएममधून काढली आहे. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करून दोघांना Pune cyber fraud  ताब्यात घेतले.या प्रकरणामुळे पुणे शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. अनेकदा सायबर गुन्हेगार लवकर पकडले जात नाहीत, मात्र या प्रकरणात पुणे सायबर पोलिसांचे तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे आरोपींना अटक करण्यात यश मिळाले. पोलिसांनी असे सांगितले की, सायबर गुन्हे रोखणे हा सध्या मोठा आव्हान ठरत आहे, पण याप्रकारे तत्काळ कारवाई केल्यास गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते.या यशामुळे सायबर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शहरात विश्वास वाढला असून, नागरिकांमध्ये देखील सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.