पुणे
Iran-Israel conflict, इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे मध्य पूर्वेत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षामुळे सौदी अरेबियातील विमान वाहतूक सेवा ठप्प झाल्याने भारतातील अनेक नागरिक तिथे अडकले आहेत. पुणे, ठाणे, जळगावसह महाराष्ट्रातील अनेक नागरिक परदेशातून परत येऊ शकत नाहीत.
राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सांगितले की, सध्या सौदी अरेबियात उमरा यात्रेसाठी गेलेले जवळपास ४५ ते ५० हजार नागरिक अडकल्याची माहिती आहे. यामध्ये शिख, जैन, ख्रिश्चन समाजातील नागरिकही आहेत. प्यारे खान यांनी नागरिकांना जवळच्या दूतावास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.अडकलेल्या नागरिकांवर आर्थिक ताणही आहे. उमरा करण्यासाठी साधारण ६५ ते ८० हजार रुपये खर्च येतो, आणि विमान वाहतूक बंद असल्यामुळे त्यांचे हॉटेल व ट्रॅव्हल एजंट यांच्याकडून दुप्पट किंवा तिप्पट पैसे मागितले जात आहेत. काही ट्रॅव्हल एजंट परिस्थितीचा गैरफायदा घेत पळून गेले आहेत.महाराष्ट्र सरकारने या परिस्थितीसाठी विशेष हेल्पलाईन व वेबसाईट सुरु केली असून, नागरिकांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, परराष्ट्र खात्याशी समन्वय साधून तिथल्या भारतीयांची सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे. UAE सरकारने अडकलेल्या भारतीयांच्या व्हिसाचा कालावधी वाढवला आहे, परंतु राहणी व अन्न यासंबंधी अडचणी सुरू आहेत.
प्यारे खान म्हणाले, Iran-Israel conflict, “सौदी अरेबियात सध्या नो फ्लाईट झोन आहे. जसे विमान वाहतूक सुरू होईल, तसे सरकार रेस्क्यू फ्लाइटद्वारे नागरिकांना भारतात परत आणेल. रस्ते मार्गाने परत आणणे कठीण आहे, त्यामुळे नागरिकांनी संयम ठेवावा.”सध्या सौदी अरेबियातील परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी अडकलेल्या नागरिकांसाठी सरकार सतत मदत करत आहे. नागरिकांनी तातडीने जवळच्या दूतावासाशी संपर्क साधावा, आणि आवश्यक ती मदत मिळवावी, असा संदेश सरकारकडून दिला जात आहे.