शंकरनगर वस्तीचा सकल हिंदू संमेलन उत्साहात

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Shankarnagar शंकरनगर वस्तीचा सकल हिंदू संमेलनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंदात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी गेल्या साधारण १५ दिवसांपासून विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. २५ वर्षांवरील महिला व पुरुषांसाठी “मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा”, १५ वर्षांपर्यंत मुलामुलींनी “भारतीय परिधान वेशभूषा स्पर्धा”, “हिंदू गृह सजावट स्पर्धा” आणि आनंद मेळावा घेण्यात आला. संपूर्ण शंकरनगरातून दुचाकी वाहन फेरीही काढण्यात आली.
 
Shankarnagar
 
शंकरनगरच्या सर्व क्षेत्रांमधून या उपक्रमांना उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला, परिणामी मुख्य उत्सव अत्यंत उत्तम रितीने संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात रामकृष्ण मठाचे स्वामी ज्ञानगम्यानंद यांच्या समर्पक आशिर्वचनाने झाली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे प्रा. अजयजी निल्दावार यांच्या मार्गदर्शनाखाली वातावरण हिंदुत्वमय झाले. Shankarnagar यानंतर वस्तीतील सर्व वयोगटातील बालक-बालिका, महिला आणि पुरुषांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय परिश्रमपूर्वक सादर केले. महाप्रसादानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. अशा प्रकारे वस्तीतील जवळपास प्रत्येक घरातून सहभाग लाभलेला हा कार्यक्रम संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्या अप्रतीम ठरला.
सौजन्य: महेश मोलकर, संपर्क मित्र