वॉशिंग्टन,
iran-israel-us-war अमेरिका आणि इस्रायल यांच्या संयुक्त कारवाईनंतर इराणमध्ये तणाव कमालीचा वाढला आहे. राजधानी तेहरानसह विविध भागांवर झालेल्या हल्ल्यांत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींनंतर इराणने क्षेपणास्त्रे आणि मानवरहित विमानांच्या साहाय्याने प्रत्युत्तर देत संघर्ष अधिक तीव्र केला असून संपूर्ण मध्यपूर्वेत अस्थिरता वाढली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या एका मुलाखतीत हे युद्ध चार आठवड्यांत किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत पूर्ण होऊ शकते, असा दावा केला. इराण हा मोठा आणि सक्षम देश असल्याचे त्यांनी मान्य केले, मात्र अमेरिकेची सर्व उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत कारवाई सुरूच राहील, असे स्पष्ट केले. आतापर्यंतच्या संघर्षात दोनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सुमारे अठ्ठेचाळीस वरिष्ठ नेत्यांचा अंत करण्यात यश मिळाल्याचा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला. iran-israel-us-war या संघर्षात तीन अमेरिकन सैनिक ठार झाल्याची अधिकृत पुष्टीही ट्रम्प यांनी केली. त्यांनी मृत जवानांना शूर योद्धे संबोधत त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकभावना व्यक्त केल्या. अशा घटना दुर्दैवी असल्या तरी संघर्षाच्या काळात त्या घडू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
इराणसोबत चर्चेची शक्यता त्यांनी पूर्णपणे नाकारली नाही. योग्य वेळी संवाद व्हायला हवा होता, असे सांगत त्यांनी सध्याच्या टप्प्यावर तातडीने चर्चा होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली. दरम्यान, बहरीन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार आणि जॉर्डनच्या नेत्यांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘ट्रुथ सोशल’वरील संदेशात ट्रम्प यांनी ही कारवाई अत्यंत गुंतागुंतीची आणि प्रभावी असल्याचे म्हटले आहे. iran-israel-us-war मोहीम पूर्ण क्षमतेने सुरू असून सर्व उद्दिष्टे साध्य होईपर्यंत ती थांबवली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. इराणकडील दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्र क्षमता अमेरिकेसाठी धोका ठरू शकते, असे सांगत ही मोहीम नियोजनानुसार पुढे जात असल्याचा दावा त्यांनी केला. मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.